पाटपन्हाळे हायस्कूलची अभिज्ञा पवारची नवोदयसाठी निवड
आबलोली (संदेश कदम)
जवाहर नवोदय परीक्षेचा निकाल जाहीर होऊन गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाची इयत्ता पाचवीमधील विद्यार्थीनी अभिज्ञा दिनेश पवार हिने इयत्ता पाचवीमधील नवोदय परीक्षेमध्ये ९३.७५ टक्के गुण संपादन करून नवोदय विद्यालयाच्या प्रवेश निवडीसाठी सुयश संपादन केले आहे.कु. अभिज्ञा पवारची जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी निवड झाल्याबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ , सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी , पाटपन्हाळे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.एस.एस.चव्हाण व शिक्षकवृंद यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.















