श्री नवलाई देवी मंदिर आबलोली येथील “खेळ पैठणीचा” उत्साहात आणि जल्लोषात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्री नवलाई देवी मंदिर आबलोली येथील “खेळ पैठणीचा” उत्साहात आणि जल्लोषात संपन्न

सौ. श्रावणी पागडे पैठणीची प्रथम मानकरी तर सौ.वृषाली पालशेतकर द्वितीय मानकरी

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील आबलोली येथील श्री.नवलाई देवी मंदिर येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री. सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. यानिमित्ताने तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य (विभाग रत्नागिरी, केंद्र गुहागर) या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय निलेश भगवान सांबरे यांच्या 50 व्या जन्मदिनाच्या निमित्ताने श्री. नवलाई देवी मंदिर आबलोली येथे महिलांसाठी खास “खेळ पैठणीचा” हा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम आबलोली गावाच्या वतीने आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय निलेश भगवान सांबरे यांच्या 50 व्या जन्मदिनाच्या निमित्ताने पैठणी खेळाचे मोफत आयोजन करण्यात आले होते.”खेळ पैठणीचा”या खेळामध्ये आबलोली गावातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. यामध्ये अटीतटीच्या सामन्यात सौ. श्रावणी अनिकेत पागडे हि पैठणीची प्रथम मानकरी ठरली तर सौ.वृषाली राकेश पालशेतकर हि पैठणीची द्वितीय मानकरी ठरली. या दोघींनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक पैठणी प्रदान करण्यात आल्या.

“खेळ पैठणीचा”या खेळामध्ये महिलांसाठी खास अनेक खेळ खेळवण्यात आले यामध्ये महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता अतिशय शिस्तबद्ध आणि जल्लोषात “खेळ पैठणीचा” कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अतिशय चांगले नियोजन आणि अँकरिंग रत्नागिरी जिजाऊ संस्थेचेपाली विभाग सदस्य साहिल गोरे यांनी केले. या कार्यक्रमापूर्वी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य सचिव केदार चव्हाण यांनी ही या कार्यक्रमाला भेट देऊन महिलांना मौलिक मार्गदर्शन केले. त्यानंतर जिजाऊ संस्थेचे गुहागर तालुका समन्वयक आणि ॲड.प्रसाद जांगळे, आबलोली गावचे खोत सचिन कारेकर, प्रमोद गोणबरे, ॲड. प्रमेय आर्यमाने यांनीही मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी सहभागी महिलांनाही मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी गावचे प्रमुख यशवंत पागडे, गावकर अनंत पागडे, दिनेश शिंदे,अनंत जानू पागडे, कृष्णा उकार्डे, कृष्णा पालशेतकर, पोलीस पाटील महेश भाटकर,निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके, सदस्या सौ. पायल गोणबरे, सौ. शैला पालशेतकर, श्रीमती. नम्रता निमुणकर, माजी सभापती सौ. पूर्वी निमुणकर, सी.आर.पी.सौ.मिनल कदम,सौ. वेदिका पालशेतकर, अंगणवाडी सेविका श्रद्धा भाटकर आदी. बहुसंख्य महिलांनी सहभाग नोंदवला होता. शेवटी ॲड.प्रमेय आर्यमाने यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आबलोलीच्या ग्रामस्थांचे तसेच जिजाऊ संस्थेचे गुहागर तालुका समन्वयक ओमकार तीवरेकर आणि ॲड. प्रसाद जांगळे तसेच उत्कृष्ट अँकर साहिल गोरे यांचे मौलिक सहकार्य लाभले

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी