गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव

rv ad

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव

आबलोली (संदेश कदम)

सम्यक कोकण कला संस्था (रजि.) महाराष्ट्र, तालुका शाखा गुहागर यांच्या वतीने संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती तसेच तालुका शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’ उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. दि. २८ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत शृंगारतळी येथील भवानी सभागृह (पालपेणे रोड) येथे हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी राज्यसंघटनेचे प्रमुख पदाधिकारी सुप्रसिद्ध कवी – गायक मंदार कवाडे (अध्यक्ष), नरेश शिंदे (सचिव), मुकुंद तांबे (उपाध्यक्ष), सुप्रसिद्ध गायिका अष्टशीला बनसोडे (उपाध्यक्षा), गायक सुभाष सावंत (कोषाध्यक्ष), गायक संजय गमरे (मुख्य संघटक), कवी – गायक विजय पवार (सदस्य), चंद्रमणी घाडगे (सल्लागार), दापोली – मंडणगड – खेड तालुकाध्यक्ष वामन तांबे आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी संगीतमय कार्यक्रमात सुप्रसिद्ध बेंजो मास्टर सुदेश जाधव, ढोलक वादक सनम किल्लेकर ऑक्टोपॅड वादक शैलू, ऑर्गन प्लेअर प्रवीण पवार यांचे संगीत ऐकायला मिळणार आहे.

गेल्या २५ वर्षांपासून सम्यक कोकण कला संस्था महाराष्ट्रभर कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नवोदित प्रतिभेला संधी देणे आणि दुर्लक्षित कलाकारांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य सातत्याने करत आहे. प्रबोधनपर गीतगायन, सामाजिक जाणिवा आणि मूल्याधिष्ठित कलाविष्कार यांचा वारसा जपणाऱ्या या संस्थेने अनेक कवी, गायक व वादक घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

याच कार्याचा गौरव म्हणून गुहागर तालुक्यातील प्रबोधनपर गीतगायनाच्या माध्यमातून समाजजागृती करणाऱ्या कवी, गायक आणि वादकांचा प्रथमच एकत्रित सन्मान करण्यात येणार आहे. सुमारे ५० हून अधिक कलावंतांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असून, त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे.

या कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, संस्थेचे पदाधिकारी, स्थानिक कलाकार आणि कला रसिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यासोबतच कवी, गायक व वादकांच्या सादरीकरणातून रंगणारा प्रबोधनपर सांगीतिक कार्यक्रमही या सोहळ्याचे आकर्षण ठरणार आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका पदाधिकारी ज्येष्ठ कवी बी.जी.पवार गुरुजी (अध्यक्ष), कवी संतोष मोहिते सर (उपाध्यक्ष), उत्तम पवार (सचिव), दीपक गमरे (सहसचिव), मिलिंद कदम (कोषाध्यक्ष), भीमसेन सावंत (सल्लागार), सुदेश जाधव (सल्लागार), प्रवीण पवार (कार्य. सदस्य), तसेच अविनाश गमरे, मनोज जाधव विशेष मेहनत घेत आहेत.

कलावंतांचा सन्मान, त्यांच्या कलेला योग्य प्रतिष्ठा मिळवून देणे आणि समाजप्रबोधनाच्या कार्याला चालना देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. गुहागर तालुक्यातील कला क्षेत्रासाठी हा सोहळा एक नवा अध्याय ठरणार असून, स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देणारा आणि प्रेरणादायी उपक्रम म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव

गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव आबलोली (संदेश कदम) सम्यक कोकण कला संस्था (रजि.)...
Read More
गुहागरमध्ये ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’; प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव

लांजा-भांबेड परिसरात काजू पिकाचे मोठे नुकसान; तातडीच्या पंचनाम्याची मागणी

लांजा-भांबेड परिसरात काजू पिकाचे मोठे नुकसान; तातडीच्या पंचनाम्याची मागणी रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा-भांबेड परिसरात दि. २७ मार्च...
Read More
लांजा-भांबेड परिसरात काजू पिकाचे मोठे नुकसान; तातडीच्या पंचनाम्याची मागणी

राज्यावर अवकाळीचे सावट! ३०-३१ मार्चला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

राज्यावर अवकाळीचे सावट! ३०-३१ मार्चला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज; पिके...
Read More
राज्यावर अवकाळीचे सावट! ३०-३१ मार्चला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

अशोक खरात प्रकरणात खळबळजनक आरोप; रूपाली चाकणकर महिलांना भोंदूकडे नेत असल्याचा दावा

अशोक खरात प्रकरणात खळबळजनक आरोप; रूपाली चाकणकर महिलांना भोंदूकडे नेत असल्याचा दावा 📌 माजी सदस्य आशा मिरगे यांचा गौप्यस्फोट; राजकीय नेते...
Read More
अशोक खरात प्रकरणात खळबळजनक आरोप; रूपाली चाकणकर महिलांना भोंदूकडे नेत असल्याचा दावा

चिपळूणमध्ये उपोषणस्थळी गोंधळ; पत्रकारावर हल्ला, ॲट्रॉसिटीसह दोन गुन्हे दाखल

चिपळूणमध्ये उपोषणस्थळी गोंधळ; पत्रकारावर हल्ला, ॲट्रॉसिटीसह दोन गुन्हे दाखल 📌 बहादूरशेख नाका येथे तणावपूर्ण परिस्थिती; डीवायएसपी बेले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू...
Read More
चिपळूणमध्ये उपोषणस्थळी गोंधळ; पत्रकारावर हल्ला, ॲट्रॉसिटीसह दोन गुन्हे दाखल

कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर भीषण ड्रोन हल्ला; इंधन टाकीला लागली आग

कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर भीषण ड्रोन हल्ला; इंधन टाकीला लागली आग सुदैवाने जीवितहानी टळली; इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर पुन्हा एकदा निशाणा...
Read More
कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर भीषण ड्रोन हल्ला; इंधन टाकीला लागली आग

जि. प. जैतापूर शाळा क्र.१ मध्ये सांस्कृतीक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा कलाविष्कार खुलला

जि. प. जैतापूर शाळा क्र.१ मध्ये सांस्कृतीक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा कलाविष्कार खुलला जैतापूर दि. २७ (प्रशांत पोवार ) विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव...
Read More
जि. प. जैतापूर शाळा क्र.१ मध्ये सांस्कृतीक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा कलाविष्कार खुलला

मातोश्रीवर हायव्होल्टेज ड्रामा! उद्धव ठाकरेंच्या भाषणात प्रियंका चतुर्वेदींचा आक्षेप; ‘I want to protest’ म्हणत व्यक्त केली नाराजी

मातोश्रीवर हायव्होल्टेज ड्रामा! उद्धव ठाकरेंच्या भाषणात प्रियंका चतुर्वेदींचा आक्षेप; 'I want to protest' म्हणत व्यक्त केली नाराजी मुंबई - शिवसेना...
Read More
मातोश्रीवर हायव्होल्टेज ड्रामा! उद्धव ठाकरेंच्या भाषणात प्रियंका चतुर्वेदींचा आक्षेप; ‘I want to protest’ म्हणत व्यक्त केली नाराजी

गुहागरमध्ये अवैध शिकारीवर वनविभागाची मोठी कारवाई; मृत रानडुक्कर व बंदुकीसह तिघे जेरबंद

गुहागरमध्ये अवैध शिकारीवर वनविभागाची मोठी कारवाई; मृत रानडुक्कर व बंदुकीसह तिघे जेरबंद गिमवी येथे रात्री उशिरा छापा; विना नंबर ४०७...
Read More
गुहागरमध्ये अवैध शिकारीवर वनविभागाची मोठी कारवाई; मृत रानडुक्कर व बंदुकीसह तिघे जेरबंद

सम्यक कोकण कला संस्था गुहागर शाखेचा रौप्यमहोत्सव; ५० कलावंतांचा भव्य सन्मान सोहळा २८ मार्चला

सम्यक कोकण कला संस्था गुहागर शाखेचा रौप्यमहोत्सव; ५० कलावंतांचा भव्य सन्मान सोहळा २८ मार्चला २५ वर्षांच्या प्रवासाचा गौरव – नवोदित...
Read More
सम्यक कोकण कला संस्था गुहागर शाखेचा रौप्यमहोत्सव; ५० कलावंतांचा भव्य सन्मान सोहळा २८ मार्चला