लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ – नाट्यलेखन स्पर्धा
मुंबई : नवोदित तसेच, प्रस्थापित लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्तीस व्यासपीठ मिळावे, मराठी नाट्यसंपदा अधिक समृद्ध व्हावी आणि नवी विचारधारा रुजावी, या हेतूने ‘मराठी साहित्य व कला सेवा’ आणि ‘कामाक्षी क्रिएटिव्ह’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नाट्य लेखन स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात येत आहे.
यात विषयाचे बंधन नसून दोन अंकी नाटक मराठीमध्ये लिहायचे आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. प्रत्येक स्पर्धक एकापेक्षा अधिक नाट्यसंहिता सादर करू शकतो. ही स्पर्धा सशुल्क आहे. स्पर्धेसाठी १ जानेवारी २०२० ते ३० जून २०२६ या कालावधीत लेखन केलेल्या नाट्यसंहिता सादर करता येतील.
संपर्क :
ई-मेल आयडीः
marathisahityavkalaseva@gmail.com वर पाठवावी. गुरुदत्त वाकदेकर ९९८७७ ४६७७६, राकेश तळगावकर ८५९१८ २५७७५













