आबलोली गावच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
आबलोली (संदेश कदम)
इंडियन काॅपीराईट प्रोटेक्शन(ॲंन्टी पायरेसी सेल मुंबई) कल्याण येथे आयोजित “भारत सन्मान गौरव पुरस्कार २०२६” या सोहळ्यात गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतीमध्ये राजकारण विरहीत समाज उपयोगी विविध उपक्रम राबवून लोकोपयोगी विकास कामे करणाऱ्या आणि जनसामान्यांमध्ये अढळ स्थान निर्माण करणाऱ्या कार्यसम्राट सरपंच सौ.वैष्णवी वैभव नेटके यांना “भारत सन्मान गौरव पुरस्कार सोहळा २०२६” या भव्य दिव्य गौरव सोहळ्यात कल्याण येथे राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.हा पुरस्कार इंडियन एअर फोर्सच्या फ्लाइंग ऑफिसर इतिशा चौहान मॅडम, अभिनेत्री,ए-स्टार्स टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स च्या संस्थापिका, ॲंन्टी पायरेसी सेल मुंबई चे मुख्य तपासी अधिकारी राम जित(जितु) गुप्ता यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.सौ.वैष्णवी वैभव नेटके यांना राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे गुहागर तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक संघटनांकडून अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत. सरपंच सौ.वैष्णवी वैभव नेटके यांना त्यांच्या समाज उपयोगी कार्याची दखल घेऊन अल्पावधीतच अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
















