सारस्वतांनी कवितेतून साजरा केला “गणेशोत्सव”

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सारस्वतांनी कवितेतून साजरा केला “गणेशोत्सव

मराठी साहित्य व कला सेवा” आणि “शोध आनंदाचा फाऊंडेशन”चे दादरमध्ये रंगले कविसंमेलन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गणपती बाप्पा घरोघरी आले, त्यांची विधीवत पूजाअर्चा झाली, लाडू मोदकांचा नेवैद्यही त्यांनी स्वीकारला, प्रत्येकाला भरभरून आशीर्वाद आणि आनंद देऊन बाप्पांचं विसर्जनही झालं. त्याच काळात मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमधून सगळे चाकरमानी कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी रवाना झाले. तिथेही त्यांनी भजन कीर्तनातून बापाचा जागर केला. इतकं सगळं करूनही काहीतरी चुकल्यासारखं प्रत्येकालाच वाटत होतं. तिच काव्यरूपी जागर करण्याची नामी संधी मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून आलेल्या निवडक निमंत्रित सारस्वतांनी दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात साधली.

“मराठी साहित्य व कला सेवा” आणि “शोध आनंदाचा फाऊंडेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने सातवे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी युवा साहित्यिक दिग्दर्शक अभिनेते शैलेश भागोजी निवाते हे अध्यक्षस्थानी होते. त्यांचे ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’चे अध्यक्ष नितीन सुखदरे, उपाध्यक्ष विद्याधर शेडगे आणि ‘मराठी साहित्य व कला सेवा’चे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर यांच्या हस्ते मानाची शाल, ग्रंथभेट आणि सुंदरसे सन्मानचिन्ह प्रदान करून स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरूवात सुंदर शिवगर्जनेसह अर्णव शेडगे ह्या बालकलाकाराने केली आणि संपूर्ण वातावरणात एक उर्जा चैतन्य पसरले. कविसंमेलनाच्या पहिल्या सत्रामध्ये सरोज सुरेश गाजरे, कल्पना दिलीप मापूसकर, स्वाती हेमंतकुमार शिवशरण, महेश अविनाश नाडकर्णी, जयश्री हेमचंद्र चुरी, सुनिता पांडुरंग अनभुले, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, सीमा विश्वास मळेकर, नंदन भालवणकर, वैभवी विनीत गावडे, राजेंद्र मधुकर सावंत, प्रणाली प्रकाश सावंत, संतोष धर्मराज मोहिते, विक्रांत मारुती लाळे, रविंद्र शंकर पाटील, प्रसाद यशवंत कोचरेकर यांनी श्रीगणेशाचा जागर करणार्‍या आपल्या सुंदर रचना सादर केल्या आणि उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली.

मध्यंतरामध्ये चहा अल्पोपहारासोबत मोदकाचा आस्वाद घेत असतांना नंदन भालवणकर यांनी सुस्वर गीत सादर केले. सुनिता अनभुले यांनी निसर्गातील आणि रोजच्या जगण्यातील अनेक गोष्टींचे निरीक्षण करून “तो आणि ती” मधला भेद उलगडत उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. तर बालगायक अर्णव शेडगे यांने “जय जय महाराष्ट्र माझा’ ह्या गीताने वातावरण भारून टाकले. दुसर्‍या सत्रात सर्व कवींनी त्यांच्या आवडत्या स्वरचित मराठी रचना सुंदररीत्या सादर केल्या.

संमेलनाध्यक्ष शैलेश भागोजी निवाते यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की त्यांनी प्रत्येक कवीची रचना शांतचित्ताने ऐकतांना त्या प्रत्येक कवितेवर एक सुंदर अशी चारोळीही लिहिली आहे. त्यापैकी काही चारोळ्या त्यांनी सभागृहात मांडल्या, उपस्थितांनी त्यांच्यातल्या ह्या शीघ्रकवीचे कौतुक टाळ्यांच्या गजरात केले. त्यानंतर मोजक्या पण नेमक्या शब्दांत सर्व कवींचे कौतुक केले. तसेच आयोजकांना शुभेच्छाही दिल्या. कार्यक्रमाची सांगता करताना ‘मराठी साहित्य व कला सेवा’ आणि ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’ यांच्या वतीने सर्व सारस्वतांना सहभाग सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

शक्तीची देवता दुर्गेचे आगमन ऑक्टोबर महिन्यात होत असल्यामुळे २० ऑक्टोबर २०२४ रोजी आठवे मासिक कविसंमेलन होणार असून त्याच्या अध्यक्षपदी युवा अभिनेते तसेच कवी रविंद्र शंकर पाटील असणार आहेत. कविसंमेलनाचे समयोचित सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर तर आभारप्रदर्शन नितीन सुखदरे यांनी केले.

कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी कल्पना मापूसकर, सुनिता अनभुले, विक्रांत लाळे, शैलेश निवाते, नितीन सुखदरे, विद्याधर शेडगे, सनी आडेकर आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी