सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल – आम. शेखर निकम यांचा विश्वास

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल – आम. शेखर निकम यांचा विश्वास

आबलोली (संदेश कदम)
कोकण हा पहाडांचा प्रदेश आहे. शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रेरित करणे व त्यांची लागवड कायम ठेवणे ही प्राथमिक गरज लक्षात घेऊन या ठिकाणी माती परीक्षण प्रयोगशाळा शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आली असून मृदा संवर्धन, गरजेनुसार खतांचा वापर या तत्त्वावर ही प्रयोगशाळा कार्यरत असणार आहे त्यामुळे सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला आहे.
शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते – दहिवली, तालुका चिपळूण व महाराष्ट्र कृषी विभाग रत्नागिरी जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळेचे उदघाटन सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार शेखर निकम व पुणे घरडा केमिकल चे उपाध्यक्ष रामकृष्ण कुलकर्णी यांच्या शुभहस्ते नुकतेच उत्साहात संपन्न झाले.
यावेळी आमदार शेखर निकम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आमदार शेखर निकम यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रयोग शाळेचा पुरेपूर वापर करत आपल्या शेतातील मातीचे आरोग्य सुधारणे तसेच उत्पन्न वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन करून शेतकऱ्यांना सहकार्य कायम राहील असा शब्द दिला आहे.
यानंतर घरडा केमिकलचे उपाध्यक्ष रामकृष्ण कुलकर्णी यांनी सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळेच्या उपक्रमास शुभेच्छा देऊन घराला केमिकल्स आपल्या सदैव पाठीशी राहून सहकार्य करेल असे आश्वासन दिले.
त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांनी या प्रयोगशाळेचा कार्य अहवाल सादर केला. या प्रयोगशाळेतून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 13000 मातीचे नमुने यशस्वी रित्या तपासून संबंधित शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले आहेत या प्रकल्पा सोबतच महाविद्यालयातील बेकरी युनिट, अत्याधुनिक संगणक कक्ष व डिजिटल रूमचे देखील उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्याचे प्राचार्य डॉ. सुनित कुमार पाटील यांनी जाहीर केले.
या संपूर्ण कार्यक्रमाला सह्याद्री शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत निकम, डॉ. ईशाक खतीब, ज्येष्ठ संचालक मारुतीराव घाग, जिल्हा परिषद सदस्य पूजा निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, सचिव महेश महाडिक यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

Pinco Online Kazino (Пинко) 2026 – Təhlükəsizlik və Məlumatların Mühafizəsi

Pinco Online Kazino (Пинко) 2026 – Təhlükəsizlik və Məlumatların Mühafizəsi ▶️ OYNA Содержимое Təhlükəsiz Oyun Ola Bilərsiniz: Pinco Online Kazino...
Read More

सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल – आम. शेखर निकम यांचा विश्वास

सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल - आम. शेखर निकम यांचा विश्वास आबलोली (संदेश कदम) कोकण हा पहाडांचा प्रदेश...
Read More
सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल – आम. शेखर निकम यांचा विश्वास

संगमेश्वरात पेरणी झाली, भाताचे कोंब फुटले; पावसाअभावी बळीराजा चिंतेत

संगमेश्वरात पेरणी झाली, भाताचे कोंब फुटले; पावसाअभावी बळीराजा चिंतेत जून अर्ध्यावर तरी पावसाची प्रतीक्षा कायम; दुबार पेरणीचे संकट आणि पाणीटंचाईची...
Read More
संगमेश्वरात पेरणी झाली, भाताचे कोंब फुटले; पावसाअभावी बळीराजा चिंतेत

ब्राझीलमध्ये हवेत दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; सहा जणांचा मृत्यू, २० वाहने जळाली

⚠️ ब्राझीलमध्ये हवेत दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; सहा जणांचा मृत्यू, २० वाहने जळाली रिओ डी जानेरोतील Recreio dos Bandeirantes परिसरात...
Read More
ब्राझीलमध्ये हवेत दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; सहा जणांचा मृत्यू, २० वाहने जळाली

कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी

कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी “एक बाठ, एक आशा” संकल्पनेतून...
Read More
कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी

एल निनोचा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

एल निनोचा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेचा अंदाज : मान्सूनची वाटचाल मंदावली; राज्यात व्यापक पावसासाठी...
Read More
एल निनोचा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

कोंडकारूळचे भजनी कलावंत विश्वास पावसकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे गौरव

कोंडकारूळचे भजनी कलावंत विश्वास पावसकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे गौरव   तीन दशकांहून अधिक काळ भजन परंपरा जपणाऱ्या कलाकाराच्या...
Read More
कोंडकारूळचे भजनी कलावंत विश्वास पावसकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे गौरव

गुहागर केंद्रस्तरीय मुख्याध्यापकांची शाळा प्रवेशोत्सव नियोजन सभा उत्साहात संपन्न

गुहागर केंद्रस्तरीय मुख्याध्यापकांची शाळा प्रवेशोत्सव नियोजन सभा उत्साहात संपन्न   नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील...
Read More
गुहागर केंद्रस्तरीय मुख्याध्यापकांची शाळा प्रवेशोत्सव नियोजन सभा उत्साहात संपन्न

RTI कार्यकर्त्याच्या पाठपुराव्याने उघडकीस आले प्रकरण; पाणीपुरवठा निधीच्या ₹3.42 लाखांच्या खर्चावर संशय

RTI कार्यकर्त्याच्या पाठपुराव्याने उघडकीस आले प्रकरण; पाणीपुरवठा निधीच्या ₹3.42 लाखांच्या खर्चावर संशयok ok रत्नागिरी प्रतिनिधी : निलेश रहाटे वाटद मिरवणे...
Read More
RTI कार्यकर्त्याच्या पाठपुराव्याने उघडकीस आले प्रकरण; पाणीपुरवठा निधीच्या ₹3.42 लाखांच्या खर्चावर संशय

रुण गोंधवली शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना चंदुरकर परिवार व ग्रामस्थांचा गोंधवली जिल्हा परिषद शाळेत स्तुत्य उपक्रम

रुण गोंधवली शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना चंदुरकर परिवार व ग्रामस्थांचा गोंधवली जिल्हा परिषद शाळेत स्तुत्य उपक्रम लांजा (प्रतिनिधी): जितेंद्र चव्हाण...
Read More
रुण गोंधवली शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना चंदुरकर परिवार व ग्रामस्थांचा गोंधवली जिल्हा परिषद शाळेत स्तुत्य उपक्रम