शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय खरवते – दहिवली येथे” मयुरपंख – २०२४ ” जल्लोष मोठ्या उत्साहात संपन्न.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय खरवते – दहिवली येथे” मयुरपंख – २०२४ ” जल्लोष मोठ्या उत्साहात संपन्न.

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय खरवते – दहिवली येथे” मयुरपंख – २०२४ ” जल्लोष मोठ्या उत्साहात संपन्न.

.!

आबलोली (संदेश कदम)…..

चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय खरवते-दहिवली येथे आंतरमहाविद्यालयीन युवा सांस्कृतिक महोत्सव “मयुरपंख – २०२४” नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोली अंतर्गत असणाऱ्या सुमारे ३१ कृषि व संलग्न महाविद्यालयांनी या युवा महोत्सवामध्ये मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाचे उदघाटन कोकण कृषि विद्यापीठ,दापोली चे कुलगुरु डाॅ.संजयजी भावे व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखरजी निकम यांचे हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमामध्ये विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये शास्त्रिय गायन,वाद्य वादन,समुह गायन,नृत्य, प्रश्नमंजुषा,वादविवाद, एकांकिका,वक्तृत्व, मुकनाटय,एकपात्री नाट्य, कोलाज,चित्रकला,पोस्टर्स निर्मिती,रांगोळी व संचलन आदीं.चा समावेश होता.तसेच शास्त्रीय संगीत स्पर्धेत शरदचंद्रजी पवार अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय विजेता तर कृषि महाविद्यालय,दापोली उपविजेता ठरले.भारतीय सुगम संगीत गायन मध्ये उद्यानविद्या महाविद्यालय,मुळदे यांनी विजेतेपद तर कृषि महाविद्यालय,दापोली यांनी उपविजेतेपद पटकावले.ताल वादन मध्ये कृषि महाविद्यालय,मुळदे यांनी उपविजेतेपद तर कृषि महाविद्यालय,दापोली यांनी विजेतेपद मिळवले.स्वरवाद्य वादन मध्ये कृषि महाविद्यालय,खरवते यांनी उपविजेतेपद तर कृषि महाविद्यालय,दापोली यांनी विजेतेपद पटकावले.समुह गायनामध्ये अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय,खरवते उपविजेते तर कृषि महाविद्यालय,दापोली विजेते ठरले.शास्त्रीय नृत्यामध्ये कृषि महाविद्यालय,मांडकी यांनी विजेतेपद पटकावले. लोकनृत्यामध्ये कृषि महाविद्यालय,दापोली यांनी विजेतेपद तर कृषि महाविद्यालय,खरवते व कृषि महाविद्यालय,मांडकी विभागून उपविजेते ठरले.मिमिक्री स्पर्धेमध्ये वनशास्र महाविद्यालय, दापोली हे विजेते तर कृषि महाविद्यालय,दापोली हे उपविजेते ठरले.

तसेच एक पात्री अभिनयामध्ये कृषि महाविद्यालय,खरवते यांना उपविजेतेपद व उद्यानविद्या महाविद्यालय,मुळदे यांना विजेतेपद मिळाले.एकांकिका स्पर्धेमध्ये कृषि महाविद्यालय, खरवते यांनी विजेतेपद व उद्यानविद्या महाविद्यालय,मुळदे यांनी उपविजेतेपद पटकावले. चित्रकला,कोलाज,पोस्टर्स निर्मिती मध्ये कृषि महाविद्यालय, किर्लोस,उद्यानविद्या महाविद्यालय,मुळदे यांनी विजेतेपद तर अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय खरवते,कृषि महाविद्यालय मांडकी व कृषि माॅडेलिंग,कार्टुनिंग,रांगोळी,स्पॉट फोटोग्राफी व संचलन आदी.मध्ये उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे,कृषि महाविद्यालय सांगुळवाडी,कृषि महाविद्यालय तोंडवली व उद्यानविद्या महाविद्यालय,मुळदे हे विजेते तर कृषि महाविद्यालय,खरवते,कृषि महाविद्यालय,दापोली,कृषि महाविद्यालय,सांगुळवाडी व कृषि महाविद्यालय,खरवते हे उपविजेते ठरले.या सर्व स्पर्धामध्ये सुमारे पाचशे विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला. या सर्व स्पर्धांच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल कुलगुरु डाॅ.संजयजी भावे यांचे कडुन शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांना गौरव चिन्ह प्रदान करण्यात आले.मयुरपंख २०२४ महोत्सव यशस्वी करण्यासाठी शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून विशेष मेहनत घेण्यात आली.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam