विद्यार्थ्यांनी कलाम यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा… अफसाना मुल्ला

गुहागर (वार्ताहर)- विद्यार्थ्यांनी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्रातून स्फूर्ती घ्यावी आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करावे, नियमित वाचन करावे, आपले जीवन समृद्ध करावे, अब्दुल कलाम यांच्या अंगी जिद्द, आत्मविश्वास, कार्यकारणभाव ,विनम्रता हे गुण होते ,त्याने भारताला विकसित करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन योगदान दिले, पृथ्वी अग्नी यासारखे क्षेपणास्त्र बनवताना त्यांचे योगदान मोलाचे होते, विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनापासून स्फूर्ती घ्यावी असे वेलदुर नवानगर मराठी शाळेत संपन्न झालेल्या वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून अफसाना मुल्ला यांनी केले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा येथे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा जयंती उत्सव कार्यक्रम वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला.त्यावेळी मुख्याध्यापक मनोज पाटील, आरोग्य सेवक घारे साहेब, शिक्षक वृंद अंजली मुद्दामवार ,धन्वंतरी मोरे ,अर्णवी नाटेकर, काव्या दाभोळकर ,संस्कार रोहीलकर, आर्या नाटेकर आदी उपस्थित होते .त्यावेळी मुख्याध्यापक मनोज पाटील ,आरोग्य सेवक घारे साहेब ,धन्वंतरी मोरे यांनी विद्यार्थ्यांना एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्राची माहिती सांगितली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली मुद्दमवार यांनी केले .तर आभार प्रदर्शन धन्वंतरी मोरे यांनी केले.plz Join whatsup group ????https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv















