वाचन‌ संस्कृती समृद्ध करणे काळाची गरज! रामिम संघ वाचनालयाचा वाचन‌ प्रेरणा दिन संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वाचन‌ संस्कृती समृद्ध करणे काळाची गरज! रामिम संघ वाचनालयाचा वाचन‌ प्रेरणा दिन संपन्न

वाचन‌ संस्कृती समृद्ध करणे काळाची गरज! रामिम संघ वाचनालयाचा वाचन‌ प्रेरणा दिन संपन्न

!…

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ज्या देशाची ग्रंथसंपदा विपूल, तो‌ देश‌ समृध्द, असे म्हटले जाते. ही गोष्ट लक्षात घेता, आजच्या पिढीने वाचन संस्कृती जोपासून ग्रंथसंपदा वाढवावयास हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक प्रफुल्ल फडके यांनी केले आहे.

राष्ट्रीय मिल मजदूर संघ सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयाच्या वतीने १५ ऑक्टोबर रोजी भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त परळच्या मनोहर फाळके सभागृहात वाचन प्रेरणादिन संपन्न झाला. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार‌ आणि लेखक प्रफुल्ल फडके प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ग्रंथालयाचे अध्यक्ष, संघटनेचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. 

प्रफुल्ल फडके आपल्या भाषणात पुढे म्हणाले, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते या नेतृत्वाने अनेक उपक्रमांना प्रोत्साहन देताना, कामगार भागात एक अद्ययावत वाचनालय उभे केले. एक काळ असा होता की, त्या वेळेच्या पिढ्या वाचन संस्कृतीने झपाटलेल्या होत्या. परंतु आजच्या युवा पिढीने मोबाईलच्या आहारी जाऊन वाचन‌ संस्कृतीकडे‌ पाठ फिरविली आहे, त्यातून सुदृढ समाजव्यवस्था घडविण्याचा उद्देश मागे पडत चालला आहे. आजची समाजव्यवस्था वैचारिक पायावर‌ खंबीरपणे उभी रहाण्यासाठी वाचकांचा लेखकाशी सातत्याने सुसंवाद घडला पाहिजे, त्यातूनच सामाजिक उत्कर्ष होऊन‌ देश‌ समृध्द होईल.

गोविंदराव मोहिते समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन म्हणाले‌, भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी जमिनीवरुन जमिनीवर मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांचा शोध लावून शक्तीशाली राष्ट्र म्हणून भारताची जगात मान उंचाविली. वाचन हाच केंद्रबिंदू मानून आपले विशाल कर्तृत्व घडविणार्‍या माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतींना खर्‍या अर्थाने उजाळा द्यायचा असेल तर‌ वाचन‌ संस्कृती अधिक जोमाने‌ वृध्दिंगत करावी लागेल. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले‌ यांच्या सारख्या महात्म्यांनी हाच विचार या मातीत रुजविला आहे, हे‌ विसरून चालणार नाही, असेही गोविंदराव मोहिते आपल्या भाषणात म्हणाले. प्रारंभी ग्रंथपाल ममता घाडी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी केले. या प्रसंगी खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ अण्णा‌ शिर्सेकर, राजन भाई लाड, सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे, लेखक-काशिनाथ माटल, रंगकर्मी राघवकुमार उपस्थित होते. वाचक प्रणय सुर्वे, श्रीमती उषा सोहनी, दिक्षा गुंजाळ यांनी आपले विचार मांडतांना वाचन संस्कृती वाढविण्याचे आवाहन केले. प्रारंभी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या‌ औचित्याने गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ग्रंथ प्रदान करुन, आजचा वाचक प्रेरणादिन‌ संपन्न करण्यात आला.plz Join whatsup group ????

https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

प्रा. जहूर बोट 'सर्वोत्तम विद्यार्थी' पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश शृंगारतळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न; समृद्धीवर...
Read More
प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रविवारी रात्री झालेल्या आयपीएल...
Read More
वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग