मनसे तर्फे उद्या गुहागर मधून भरणार उमेदवारी अर्ज….गुहागर तालुक्याचा विकासात्मक कायापालट करण्यासाठीच मनसे निवडणूक रिंगणात – प्रमोद गांधी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 मनसे तर्फे उद्या गुहागर मधून भरणार उमेदवारी अर्ज….गुहागर तालुक्याचा विकासात्मक कायापालट करण्यासाठीच मनसे निवडणूक रिंगणात – प्रमोद गांधी

बेरोजगारीचा प्रश्न केंद्रस्थानी, विकासात अजूनही मतदारसंघ मागेच

आबलोली (संदेश कदम)

गुहागर विधानसभा मतदारसंघात विकासाची कामे आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांनी केलेली नाहीत. आरोग्य, शिक्षण याबरोबरच बेरोजगारीचा प्रश्न आजही गंभीर आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळणेही कठीण झाले आहे. केवळ पाखाड्या, रस्ते झाले म्हणजे विकास नाही. उद्योगधंदे, पर्यटन विकास या माध्यमातून गुहागर अजूनही मागे आहे. त्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि गुहागर तालुक्याचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक रिंगणात उतरली असून सोमवार दि. २८ रोजी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी शृंगारतळी येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

गुहागरमध्ये आजपर्यंत दोन घराण्यांभोवतीच सत्ता राहिली आहे. तेच येथील प्रस्थापीत आहेत. सर्वसामान्यांची कामे होत नाहीत. स्थानिक आमदारांकडे एखाद्या गावातला कार्यकर्ता काम घेऊन गेला तर तुमच्या गावातून मतदान मला किती झाले असा प्रश्न केला जातो. जलजीवनसारख्या पाणीयोजना अजूनही रखडलेल्या आहेत. गुहागर-विजापूर महामार्गाची ५ वर्षात कशी अवस्था झाली आहे. आरोग्य यंत्रणा सुस्थितीत नाही. उच्च शिक्षणासाठी मुलांना बाहेर जावे लागते. उद्योगधंदे नसल्याने येथील तरुण मुंबई, पुणेसारख्या शहरात नोकरी-व्यवसायासाठी जातो. हे वर्षानुवर्षे आमदारकी सांभाळणाऱ्या नेत्यांना दिसून येत नाही. केवळ निवडणुका आल्या की, भूमीपूजने करायची. निवडून आल्यानंतर सुरुवातीपासून ही भूमीपूजने का केली जात नाहीत, असा सवाल प्रमोद गांधी यांनी उपस्थित केला आहे.

माझ्यासमोर तगडा उमेदवार कोणीच नाही असे म्हणणाऱ्या आ. भास्कर जाधव यांचा तो अहंकार आहे. ते पक्ष म्हणून असे बोलत नाही. स्वतःचा मोठेपणा त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होतो. मी म्हणजे विकास हा त्यांचा भ्रम आहे. गुहागर तालुक्यात विकास झालेलाच नाही. त्यामुळे विकास हाच ध्यास घेऊन मनसे निवडणूक रिंगणात उतरली आहे. राजसाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व घेऊनच आम्ही यावेळी गुहागरमध्ये  परिवर्तन घडवून आणणार आहोत. लोकसभा निवडणूक दरम्यान, राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता तो काही मागण्यांसंदर्भात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी या आग्रही मागण्या सादर केल्या होत्या. त्यातील एका मागणीची सोडवणूक झाली असून मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा हे ठाकरे यांचे मोठे यश असल्याचे गांधी यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, चिपळूण तालुकाध्यक्ष विश्वनाथ डोळस, सचिव संदेश साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam