राहुल गांधींवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राहुल गांधींवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली, अपशब्द वापरत म्हणाले, “ते आपल्याला…”

 

लातूर – महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सगळ्याच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तसंच भाषणं, मुलाखती, सभा, रॅली हे देखील सगळं वाढलं आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक २० नोव्हेंबरला आणि निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींवर टीका करताना अपशब्द वापरले आहेत.

 

*एक मत असं आणा की..*

 

प्रकाश आंबेडकर लातूरच्या सभेत म्हणाले, “आपल्याला म्हणजेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे यासाठी तुमच्याबरोबर आणखी एक मत आणा. हे आणखी एक मत म्हणजे तुमच्या भावाचं, तुमच्या बायकोचं किंवा तुमच्या कुटुंबातलं नाही. तर हे एक मत असं हवं आहे जे आपल्याला विजय मिळवून देईल.” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

 

*प्रकाश आंबेडकर यांची लातूरमध्ये सभा*

 

प्रकाश आंबेडकर यांनी लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासाठी सभा घेतली. या सभेत त्यांनी भारतीय संविधानाच्या मुद्द्यावर चर्चा केली आणि यावेळी त्यांच्या व्यंगात्मक भाषणात राहुल गांधी यांच्यावर तीव्र टीका केली. तसंच प्रकाश आंबेडकर यांनी भारताच्या संविधानाच्या रक्षणाचे महत्त्व अधोरेखित केलं आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल आपले विचार व्यक्त केले. राहुल गांधींच्या मागील विधानांच्या संदर्भात त्यांनी त्यांच्या काही निर्णयांना विरोध केला.

 

*राहुल गांधींबाबत काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?*

 

राहुल गांधी तुम्हाला चु#+#$ बनवत आहेत. यापेक्षा वापरण्यासाठी दुसरा शब्द माझ्याकडे नाही. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार हे एका बाजूला आणि संविधान वाचवणार असे दुसऱ्या बाजूला. जो संविधानप्रेमी आहे त्यांनी भाजपाला लाथाडलं. त्यामुळे मोदी आता संविधान डोक्याला लावल्याशिवाय भाषणच करत नाहीत. मी इथल्या मुस्लिम बांधवांना आवाहन करतो की मागच्या पाच वर्षांत फार मोठ्या प्रमाणात हल्ले झाले. मात्र वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठिशी उभी राहिली. काँग्रेस, डावे कुणीही आले नाहीत. त्यामुळे मुस्लिम बांधवांना माझं आवाहन आहे की यावेळेस वंचितच्या बाजूने उभे राहा असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

 

*मुस्लिम बांधव आमच्या बाजूने उभे का राहात नाहीत?-प्रकाश आंबेडकर*

 

महाराष्ट्रात ३२ जागा अशा आहेत जिथे एका बाजूला उद्धव ठाकरेंनी सेना आहे. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंची सेना आणि तिसऱ्या बाजूला वंचितचा उमेदवारआहे. उलेमांच्या संघटना, मौलवी यांना माझा सवाल आहे की एकनाथ शिंदे तुमच्या बाजूने नाही, उद्धव ठाकरेंची शिवसेना वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टीच्या विरोधात गेली. बाबरी मशीद शहीद केली असा डंका ते मिरवतात. वंचित बहुजन आघाडी मागची पाच वर्षे उभी राहिली आहे तर मग वंचितला पाठिंबा देण्यात तुम्हाला लाज का वाटते आहे? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

तवसाळ येथील ‘नवसाला पावणारी’ श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा

तवसाळ येथील 'नवसाला पावणारी' श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा तवसाळ (प्रतिनिधी- सुजित सुर्वे): रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
तवसाळ येथील ‘नवसाला पावणारी’ श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग   ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : मराठा मंडळ, ठाणे...
Read More
मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सिंधुरत्न समृद्ध योजनेसाठी ५०० कोटींची मागणी...
Read More
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; 'रॉयल इलेव्हन' कडून विद्यार्थ्यांचा गौरव आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जगभरात हृदयरोग मृत्यूचे...
Read More
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

*श्रीरामपूर शहरवासीयांची* *गत झाली केवीलवाणी!*   *प्यावे लागत आहे चक्क* *दुर्गंधीयुक्त घाण पाणी !!*   ----------------------------------------- श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे...
Read More
श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय
Play sound