उद्धव ठाकरेंची सलग दुसऱ्या दिवशी बॅग तपासली; टीकेवर आले निवडणूक आयोगाचे उत्तर!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

उद्धव ठाकरेंची सलग दुसऱ्या दिवशी बॅग तपासली; टीकेवर आले निवडणूक आयोगाचे उत्तर!

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासल्यावरून महाराष्ट्रात राजकीय टीका सुरु झालेली असतानाच आज सलग दुसऱ्या दिवशी देखील ठाकरेंच्या बॅगांची झडती घेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यावरून ठाकरेंनी तपासणाऱ्या अधिकाऱ्यांना अशाच मोदी, शाह, शिंदेंच्या बॅगा तपासा, असे म्हटले आहे. यावर आता निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे.*

काल वणी येथे ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. आज सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली, आजची घटना लातूरमध्ये घडली आहे. औसामध्ये प्रचारसभेसाठी आलेल्या ठाकरे यांनी आजही संताप व्यक्त केला. आजवर कोणाकोणाच्या बॅगा तपासल्या असा सवाल ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केला आहे.

योगायोग म्हणजे उद्धव ठाकरे हेच पहिले या दोन्ही मतदारसंघांत हेलिकॉप्टरने पोहोचले आहेत. यामुळे अधिकाऱ्यांनीही ठाकरेंना जशासतसे उत्तर देत तुम्हीच पहिले आहात असे सांगितले. यावर ठाकरेंनीही मीच पहिला गिऱ्हाईक का, असा सवाल विचारला आहे. याचा व्हिडीओ ठाकरेंनीच शूट करून सोशल व्हायरल केला आहे. असे असले तरी निवडणूक आयोगाने याची दखल घेतली असून यंत्रणा नियमावलीनुसार आपले काम करत असल्याचे म्हटले आहे.

तसेच लोकसभा निवडणुकीत 24 एप्रिल 2024 रोजी बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यात आली होती आणि 21 एप्रिल 2024 रोजी बिहारच्या कटिहार जिल्ह्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यात आली होती, असेही आयोगाने म्हटले आहे.

सुरेश प्रभू, एकनाथ शिंदेंपासूनचे बॅगा न तपासणी प्रकरण…

प्रचारावेळी नेत्यांच्या हेलिकॉप्टरमधून सर्रास बॅगा उतरत असतात. काही वर्षांपूर्वी सुरेश प्रभू मंत्री असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमधून बॅगा उतरविण्यात आल्या होत्या. यावेळी विरोधकांनी त्यांच्या बॅगा तपासण्याची मागणी केली होती. परंतू, बॅगांची तपासणी न झाल्याने राजकीय आरोप झाले होते. तसेच लोकसभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बॅगा उतरविल्या होत्या. यावेळी देखील ठाकरे शिवसेनेने शिंदेंनी करोडो रुपये बॅगेतून नेल्याचा आरोप केला होता. यानंतरच्या दौऱ्यात शिंदेंची बॅग तपासण्यात आली होती, तेव्हा विरोधकांनी हा फार्स असल्याचे म्हटले होते.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के