रामदास भाई च्या वक्तव्याने गुहागर भाजपमध्ये नाराजी बेंडलांसाठी धोक्याची घंटा.
शृंगारतळी (मयुरेश भागवत ) – ऐन निवडणुकीच्या काळात भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचार थांबवला आहे .शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी प्रचार थांबवला आहे . मतदानाला आठ दिवस असताना गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने काम थांबवल्यामुळे महायुतीमध्ये मोठी खळबळ.उडालि आहे. इशारा भाजपाचे गुहागर चे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी पत्रकार परिषदेतून इशारा दिला आहे .
आमच्या नेत्यावरती कोणीही काही बोललेलं आम्ही सहन करणार नाही. रामदास कदम आणि भास्कर जाधव यांचे मिली भगत असल्याचा भाजपने आरोप केला आहे निवडणुकीनंतर निकाल वेगळे आल्यास भाजपाला जबाबदार धरू नये – भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे वरिष्ठ नेत्यांना स्पष्ट संकेत माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्यासह जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी दिले आहेत.
आज प्रसार माध्यमांशी बोलताना तीनही तालुक्याचे तालुकाध्यक्ष बैठकीत उपस्थित होते.