कोण होणार मुख्यमंत्री ? पुन्हा एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोण होणार मुख्यमंत्री ? पुन्हा एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस

मुंबई:—महायुतीच्या सरकारचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्रिपदी कायम राहणार की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनणार? याबाबत वेगवेगळे दावे केले जाऊ लागले आहेत. मुख्यमंत्रिपदी अजित पवारांचीही अचानक वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तीन पक्षांमध्ये सत्ता वाटप करताना काही फॉर्म्युल्यांवर विचार होऊ शकतो.

महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद कुणाला मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा संधी मिळणार का याबाबत उत्सुकता आहे. रेकॉर्डब्रेक जागा जिंकून आणणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यांचा पुन्हा ‘राजतिलक’ होणार का? याबाबतची चर्चा सुरु झाली आहेत. अजितदादांनाही मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. राजकीय अभ्यासकांच्या मते मुख्यमंत्रीपदासाठी काही फॉर्म्य़ुल्यावर विचार होऊ शकतो.

भाजपमधील फडणवीस समर्थक मात्र छातीठोकपणे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असं सांगत आहेत. शिवसेना नेते तर पुन्हा एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्रिपदाची संधी मिळावी अशी मागणी करु लागलेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार निवडून आले आहेत.

भाजपची साथ देणाऱ्या अजित पवारांनाही यावेळी संधी मिळेल असं त्यांचे पाठिराखे सांगू लागले आहेत. असे असले तरी दिल्लीश्वरांच्या मनात काय आहे? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झाल्यानंतरच सत्तावाटपाचा फॉर्म्युलाही जनतेसमोर येणार आहे.

महायुतीला मिळालेल्या अभुतपूर्व यशानंतर आता सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री कोण होणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे पक्षानं 57 जागा जिंकल्या आहेत. त्याचसोबत त्यांना 4 अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. शिदेंच्या आमदारांनी शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

तर सर्वाधिक आमदार निवडून आल्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री व्हावा अशी भाजपच्या आमदारांची अपेक्षा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार? याचीच जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन