शपथविधीनंतर महायुतीची पहिली मंत्रिमंडळ बैठक; फडणवीस यावेळी कसोटी सामना गाजवणार!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शपथविधीनंतर महायुतीची पहिली मंत्रिमंडळ बैठक; फडणवीस यावेळी कसोटी सामना गाजवणार!

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्रात नव्या सरकारच्या शपथविधीनंतर महायुती सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यावेळीचा डाव कसोटी सामन्यासारखा असेल. महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात पुढे नेऊ. यासोबतच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या निधीतही वाढ केल्याची घोषणा करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजनेंतर्गत सध्या १५०० रुपये दिले जात आहेत, ते २१०० रुपये करण्यात येणार आहेत. मात्र, आम्ही आर्थिक स्रोत मजबूत करू, मग त्याचा विस्तार करू.

 

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळात फारसा फेरबदल होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. तर ७, ८ आणि ९ डिसेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार आहे. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक ९ डिसेंबरला होणार असून मंत्रिमंडळ निश्चित झाले आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी सर्व मंत्र्यांच्या शपथविधीनंतर खात्यांचे वाटप होणार आहे. ते म्हणाले- सर्वांना बरोबर घेऊन जाणारे सरकार तुम्हाला दिसेल, अडचणी आल्या तर सर्व मिळून मार्ग काढू आणि महाराष्ट्राला पुढे नेऊ.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, गेल्या अडीच वर्षात आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केले आहे आणि येथूनही महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करू आणि आता थांबणार नाही, दिशा आणि गती एकच आहे, फक्त भूमिका बदलली आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही निर्णय घेऊ. आम्हांला आमच्या जाहीरनाम्यात नमूद केलेली कामे पूर्ण करायची आहेत.

 

आपल्या पहिल्या निर्णयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला मदत मंजूर केली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या फाईलवर स्वाक्षरी करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात राहणाऱ्या चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने आपल्या पतीच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीकडे मदत मागितली होती. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्र्यांनी फाइलवर स्वाक्षरी केली.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक गुहागर, ता. १ : तालुक्याच्या...
Read More
गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन  पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले; रत्नागिरी:- निलेश रहाटे राजापूर तालुक्यातील आंगले गावातील बौद्ध वाडी परिसरात धोकादायक स्थितीत असलेले जुने...
Read More
आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More
आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई