वाटद ग्रामपंचायत मधील ठराव वर पं.स.रत्नागिरी गट विकास अधिकारी यांचे दुर्लक्ष
रत्नागिरी खंडाळा :- माहिती अधिकार मधून माहिती मागवणे हा सर्वांना अधिकार २००५ मध्ये प्राप्त झाला. व त्याच प्रमाणे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे मुख्य प्रचार प्रमुख व शाशन बातम्या पत्रकार श्री निलेश रहाटे हे आपल्या ग्रामपंचायत ची माहिती झालेल्या कामाची मागवत असतात पण हयाच कायद्याला ग्रुप वाटद मिरवणे ग्रामपंचायत मधील सरपंच श्री.अमित वाडकर, उप सरपंच सौ.सुप्रिया नलावडे व सदस्य, पोलीस पाटील श्री. सुधाकर शिर्के, माजी तंटा मुक्ती अध्यक्ष श्री सुनिल जाधव ,तत्कालीन ग्रामविकास अधिकारी श्री रमेश डडमळ हयांनी ग्रामस्थ हयांना सहवासात घेऊन निलेश रहाटे व मतदार, ग्रामस्थ हयांनी RTI मधून ग्रामपंचायत ची माहिती मागवत असतील तर माहिती कोणाला ही देऊ नये असा ठराव दि :- १५ मे २०२४ च्या ग्रामसभेला केला होता व त्याची एक प्रत वरिष्ठ अधिकारी कडे सुद्धा पाठवण्यात आली होती. त्या मध्ये RTI कार्यकर्ता व पत्रकार श्री निलेश रहाटे माहिती मागऊन आम्हाला त्रास देत आहेत व ग्रामपंचायत च्या बातम्या व विडिओ बनवून ग्रामपंचायत ची बदनामी करत असून त्याचा विरोधात भविष्यात न्यायालयात जाऊ असा धमकी दिलेला ठराव करून घेतला होता व ह्या संदर्भात पंचायत समिती मधील गट विकास अधिकारी श्री जे.पी. जाधव वर्ग १ चे अधिकारी हयांना सप्टेंबर मध्ये तक्रार करून सुद्धा आज पर्यत कुठची ही कारवाई नाही उप मुख्यकार्यकारी अधिकारी श्री राहुल देसाई नी BDO ना आदेश देऊन सुद्धा त्याच्या पत्राला सुद्धा केराची टोपली दाखवली गेली. जसे काय ग्रामपंचायत व अधिकारी हे त्याच्या जवळचेच आहेत म्हणून कारवाई ला वेळ व दुर्लक्ष करत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
*निलेश रहाटे :- ???? श्री. जे. पी. जाधव हयांना कॉन्टॅक्ट केला असता त्याच्या कडून कुठच्या ही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही. सरकारी कायद्याला सरकारी बाबू च अश्या प्रकारे कायदे व सामान्य नागरिका चे अधिकार संपवत असतील तर त्याच्या वर योग्य ती कारवाई न केल्यास माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी समोर धरणे आंदोलन करण्यात येईल.*















