भराडी देवीने कौल दिला, आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख २२ फेब्रुवारी २०२५.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भराडी देवीने कौल दिला, आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख २२ फेब्रुवारी २०२५, चाकरमान्यांची लगबग सुरु

सिंधूदुर्ग – समस्त कोकणवासियांच्या नजरा लागलेली आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली आहे. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी आंगणेवाडी येथे देवीचा वार्षिक उत्सव होणार आहे. तळकोकणातील भराडी देवीला कौल लावून झाल्यानंतर यात्रेची तारीख निश्चित केली जाते. गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेली ही प्रथा यावेळीही पार पाडण्यात आली आहे. देवीने कौल दिल्यानंतर आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने यात्रेची तारीख आज सकाळी जाहीर केली आहे.
*नवसाला पावणारी देवी*
या भराडी देवीचे महत्त्व असे की, नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी या देवीची ख्याती आहे. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवीची प्रसिद्धी आहे. तळ कोकणामध्ये थंडीचा हंगाम सुरू झाल्यानंतर भराडी देवीकडे सर्व भक्तांचे लक्ष लागलेले असते. या भराडी देवीच्या उत्सवाला महाराष्ट्रातून नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरुन सुद्धा मोठ्या प्रमाणावर भक्तजन येत असतात. त्याचप्रमाणे या भराडी देवीकडे राजकीय नेत्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर मांदियाळी पाहायला मिळते.
*चाकरमान्यांची तिकिटासाठी लगबग*
सिंधुदुर्गातील सुपुत्र असलेले राजकारणी नेते मंडळी या यात्रेला आवर्जून भेट देत असतात आणि आपले गाऱ्हाणे या देवीकडे मांडत असतात. त्याचप्रमाणे गावातील मुंबईस्थित चाकरमानी तर यात्रेच्या तारखेकडे डोळे लावून असतात. डिसेंबर महिना आला की मुंबईस्थित चाकरमानी, मित्रमंडळी आपआपल्या नातेवाईकांना सतत संपर्क ठेवून असतात. तारीख निश्चित झाली की यात्रेत येण्यासाठी तिकीट बुकिंगसाठी गर्दी, सुट्टीसाठी धडपड करत असतात.
भराडी देवी हे आंगणे कुटुंबीयांचे खाजगी देवस्थान असून या देवीच्या उत्सवाला आणि यात्रेला आंगणे कुटुंबीय दरवर्षी मोठ्या प्रमाणावर येत असतात. या यात्रोत्सवामध्ये धार्मिक विधी आंगणे कुटुंबीयांकडून मोठ्या प्रमाणावर केले जातात. या यात्रा उत्सवची तारीख आज सकाळी मंडळाच्या वतीने २२ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
दरवर्षी या यात्रा उत्सवाला दहा ते बारा लाख भाविक येत असतात. या यात्रा उत्सवाला मोठ्या प्रमाणावरती भाविक येत असल्यामुळे पोलीस प्रशासन देखील सतर्क असलेलं पाहायला मिळतं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दरवर्षी विशेष काळजी घेत असतात.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक गुहागर, ता. १ : तालुक्याच्या...
Read More
गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन  पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले; रत्नागिरी:- निलेश रहाटे राजापूर तालुक्यातील आंगले गावातील बौद्ध वाडी परिसरात धोकादायक स्थितीत असलेले जुने...
Read More
आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More
आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई