राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?

नाशिक : —राज्यातील सर्व पंपांवर आता २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल वितरणास सुरुवात झाली आहे. यापूर्वी हे प्रमाण १० ते १५ टक्के होते. इथेनॉल मिश्रित पेट्रोल पाण्याच्या संपर्कात आल्यास वाहनांचे इंजिन खराब होण्याचा धोका संभवतो.

याकडे पंपचालकांकडून लक्ष वेधले गेले. पुणे पेट्रोल वितरकांच्या संघटनेने पेट्रोल आणि वायू मंत्रालयाकडे यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. आता इथेनॉलचे दुपटीने वाढलेले प्रमाण वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा पाहणारी ठरण्याची शक्यता आहे.

बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयोसीएल या तेल कंपन्यांचे राज्यात जवळपास सहा हजार पंप असून या सर्व ठिकाणी सरसकट २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोलचा पुरवठा सुरू झाल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केले. सरकारी धोरणानुसार ही प्रक्रिया पुढे जात आहे. मात्र, इथेनॉलच्या बदललेल्या प्रमाणाविषयी कंपन्यांनी स्पष्टता केलेली नसल्याचे पंपचालकांचे म्हणणे आहे. अनेक पंपांवरील साठवणूक टाक्या जुन्या असल्याने तिथे पाणी गेल्यास इथेनॉल पेट्रोलपासून विलग होते. त्याचा रंगही बदलतो. असे इंधन भरल्याने वाहनात दोष उद्भवल्यास वाहनधारकांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागते, असा दावा त्यांनी केला.

इथेनॉलमिश्रित पेट्रोल विक्रीमुळे ग्राहकांची वाहने व पंपचालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार काही महिन्यांपूर्वी पुणे पेट्रोल वितरक संघटनेने केली होती. या घटनाक्रमात इथेनॉलचे प्रमाण वाढल्याने पंपचालकही धास्तावले आहेत. पंपावरील इंधन टाकी, वाहिनी व यासंबंधीची संपूर्ण व्यवस्था तेल कंपन्यांच्या मालकीची आहे.

त्यामुळे टाकीत वा अन्यत्र पाणी जाणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी कंपन्यांची असल्याचे ते सांगतात. कंपन्यांना हे आक्षेप मान्य नाहीत. राज्यात काही पंपांवर प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग केल्यानंतर त्याची अंमलबजावणी झाली. वाहनधारकांच्या तक्रारी नसल्याचा दावा होत आहे.

पेट्रोल व इथेनॉल योग्य प्रकारे मिसळले तर, अडचणी येत नाहीत. काही पंपांवर २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल देऊन अभ्यास केला गेला. काही महिन्यांपासून ते वापरात असल्याची माहिती तेल कंपन्यांनी दिल्यास ग्राहकांची मानसिकता तयार होईल.

अमोल बनकर (सचिव, नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर वेल्फेअर असोसिएशन)

केंद्र सरकारच्या धोरणानुसार तेल कंपन्यांकडून राज्यात २० टक्के इथेनॉलमिश्रित इंधन वितरणास सुरुवात झाली आहे. पंपधारकांनी इथेनॉलमिश्रित इंधन असो की नसो, आपल्या टाकीत पाणी जाणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. इंधनातील इथेनॉलच्या प्रमाणाबद्दल इंधन कंपन्यांनी कधीही जाहिरात केलेली नाही.

विनोद बोस (व्यवस्थापक, बीपीसीएल, मनमाड डेपो)

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

तवसाळ येथील ‘नवसाला पावणारी’ श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा

तवसाळ येथील 'नवसाला पावणारी' श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा तवसाळ (प्रतिनिधी- सुजित सुर्वे): रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
तवसाळ येथील ‘नवसाला पावणारी’ श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग   ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : मराठा मंडळ, ठाणे...
Read More
मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सिंधुरत्न समृद्ध योजनेसाठी ५०० कोटींची मागणी...
Read More
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; 'रॉयल इलेव्हन' कडून विद्यार्थ्यांचा गौरव आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जगभरात हृदयरोग मृत्यूचे...
Read More
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

*श्रीरामपूर शहरवासीयांची* *गत झाली केवीलवाणी!*   *प्यावे लागत आहे चक्क* *दुर्गंधीयुक्त घाण पाणी !!*   ----------------------------------------- श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे...
Read More
श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय
Play sound