पाचेरी सडा नं.1 या शाळेतील इयत्ता पाचवी चा विद्यार्थी कु. ओंकार संतोष आंब्रे याची तालुकास्तरावर निवड
गुहागर – जिल्हा परिषद, रत्नागिरी आयोजित ‘जाणू विज्ञान, अनुभवू विज्ञान ,’ अंतर्गत नासा इस्रो परीक्षेत गुहागर तालुक्यातील परीक्षेस बसलेल्या 3000 विद्यार्थ्यांमध्ये 119 वा क्रमांक प्राप्त करून पाचेरी सडा नं.1 या शाळेतील इयत्ता पाचवी चा विद्यार्थी कु. ओंकार संतोष आंब्रे याची तालुकास्तरावर निवड झाली आहे. त्याबद्दल त्याचे अभिनंदन.
शा.व्य.समिती , मुंबईकर मंडळी, सर्व पालक , मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद ,ग्रामपंचायत पाचेरी सडा, यानी त्याला शुभेच्छां दिल्या आहेत.















