जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात; ३०० फूट खोल दरीत वाहन कोसळले; ५ जवानांचा मृत्यू

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात; ३०० फूट खोल दरीत वाहन कोसळले; ५ जवानांचा मृत्यू

श्रीनगर– जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात आज मंगळवारी सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. मेंढर क्षेत्रातील बलनोई परिसरात लष्कराचे एक वाहन सुमारे ३०० फूट दरीत कोसळून भीषण अपघात घडला. या भीषण अपघातात ५ जवानांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेत अनेक जवान जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच लष्करी अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचावकार्य सुरु केलं आहे. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृतीबद्दलची माहिती लष्कराकडून अद्याप देण्यात आलेली नाही.

लष्कराच्या वाहनात ८-९ जवान होते. त्यातील ५ जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. अन्य जवानांवर उपचार सुरु आहेत. नीलम मुख्यालयाहून बलनोई घोरा पोस्टकडे जात असलेलं सैनिकांचं वाहन घोरा पोस्टवर पोहोचताच अपघातग्रस्त झालं. जवानांची गाडी थेट ३०० ते ३५० फूट दरीत पडली. अपघाताची माहिती मिळताच ११ एमएलआयची क्यूआरटी लगेचच पोहोचली. त्यांनी बचावकार्य सुरु केलं. भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कोरनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट केलं आहे. ‘पुंछ सेक्टरमध्ये ऑपरेशन ड्युटी दरम्यान एका वाहन दुर्घटनेदरम्यान पाच शूर जवानांचा मृत्यू झाला. त्याबद्दल व्हाईट नाईट कॉर्प्सचे सगळ्या रँकचे जवान सहवेदना व्यक्त करतात. बचावकार्य सुरु आहे. जखमी जवानांवर उपचार सुरु आहेत,’ असं व्हाईट नाईट कोरनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

गेल्या महिन्यात असाच एक अपघात जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात झाला होता. त्यात एका सैनिकाचा मृत्यू झाला, तर एक जवान जखमी झाला होता. ४ नोव्हेंबरला कालाकोटच्या बडोग गावाजवळ हा अपघात झाला. नायक बद्रीलाल आणि शिपाई जय प्रकाश गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लाल यांची प्राणज्योत उपचारादरम्यान मालवली. २ नोव्हेंबरला जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात एक कार डोंगरावरुन रस्त्यावरुन खोल दरीत कोसळली होती. या अपघातात एक महिला आणि तिच्या १० महिन्यांच्या मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam