केंद्रीय मंत्र्यांची पुण्यात  घोषणा; ग्रामीण भागातील गरीबांसाठी १९ लाख ६६ हजार घरे केंद्र सरकार देणार.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्रीय मंत्र्यांची पुण्यात  घोषणा; ग्रामीण भागातील गरीबांसाठी १९ लाख ६६ हजार घरे केंद्र सरकार देणार.

महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही सर्वात मोठी भेट : देवेंद्र फडणवीस

पुणे -पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण गरीबांसाठी 19 लाख 66 हजार घरे यावर्षी देण्यात येणार असल्याची घोषणा देशाचे कृषी मंत्री आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे. सोमवारी किसान सन्मान दिवस 2024 निमित्ताने पुण्यातील केंद्र सरकारच्या कृषी विज्ञान केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी राज्यातील ग्रामीण भागातील गरीब नागरिकांसाठी चौहान यांनी मोठी घोषणा केली.

देवाभाऊ” जनतेचे जीवन बदलण्यासाठी मुख्यमंत्री झालेत…

शिवराज सिंह चौहान म्हणाले, माझा महाराष्ट्राशी सखोल संबंध आहे. मी महाराष्ट्राचा जावई आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे छोटे भाऊ आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतासाठी देवाचं वरदान आहेत. तर देवाभाऊ महाराष्ट्राच्या जनतेचे जीवन बदलण्यासाठी मुख्यमंत्री झाले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. शरद पवार कृषी मंत्री असताना २३ हजार बजेट होतं ते आता १ लाख २७ हजार करोड इतक झाल आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे परंतू शेतीची प्रत पुढील पिढीसाठी चांगली राहिली पाहिजे, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.

केंद्रीय मंत्र्यांची पुण्यात  घोषणा; ग्रामीण भागातील गरीबांसाठी १९ लाख ६६ हजार घरे केंद्र सरकार देणार.

महाराष्ट्राला २० लाख घरे मिळणार.

पुढे बोलताना म्हणाले, मी ग्रामविकास मंत्री देखील आहे. प्रत्येक गरिबाकडे स्वतःचं पक्क घर असलं पाहिजे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आमचा प्रयत्न आहे. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत. यापूर्वी ६ लाखपेक्षा अधिक लोकांना घर मिळाली होती. १३ लाख २९हजार महाराष्ट्रातील गरिबांना घरे भेटणार आहेत. आता महाराष्ट्राला जवळपास २० लाख घरे मिळालेली आहेत. पुढील एका वर्षांत ही घर भेटणार आहेत. ज्यांना यापूर्वी घर भेटले नाही, त्या सर्वांना स्वतःचे घर भेटणार आहे. ज्यांच्याकडे २ चाकी गाडी आहे, त्यांना पण प्रधानमंत्री आवास योजनेतून घर भेटणार आहे, अशी घोषणा शिवराज सिंह चौहान यांनी केली.

महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही सर्वात मोठी भेट : देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घरं मंजूर केली होती, ते टार्गेट वाढवण्यात आले आहे. अतिरिक्त 13 लाख घरे आपल्याला देण्यात आलेली आहेत. एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीने महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता एका वर्षात 20 लाख घर देण्याची घोषणा आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे.

पुढे म्हणाले, महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे, कोणत्याही राज्याला आत्तापर्यंत इतक्या संख्येने घरे मिळालेली नाहीत, जवळपास वीस लाख घरे आपल्याला मिळालेली आहेत. आवास प्लसमध्ये 26 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन आहे. आता ही 20 लाख घरे मिळाल्याने अनेकांना घरे मिळणार आहेत, त्याचबरोबर पूर्वी जे निकष होते, त्यातील काही निकष हे शिथील देखील करण्यात आले आहेत, ज्यांची नावे सुटली होती, जे खरे बेघर आहेत, अशा सर्वांना नव्या सर्वेक्षणात घरे देण्यात येणार आहेत, पुढील पाच वर्षांमध्ये सर्व बेघरांना घरे देण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam