तळवली प्रशालेत वार्षिक क्रीडा महोत्सव…
तळवली (मंगेश जाधव)…..
पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता गुहागर जि रत्नागिरी येथे दि. 23.12.2024 ते 24.12.2024 या कालावधीत वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एम ए थरकार सर यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकवण्यात आला. तर… शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रदीप चव्हाण साहेब यांच्या हस्ते हाॅकीचे जादुगार ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच यावेळी कु. समीरा जोशी हिने क्रीडा प्रतिज्ञा दिली.
प्रारंभी सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी यांचे स्वागत केले. क्रीडा शिक्षक श्री. बी. जी. बागल सर यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेचे सर्व नियम सांगितले, स्पर्धेचे स्वरूप केले. जेष्ठ शिक्षक श्री. देवरुखकर सर यांनी प्रस्ताविक व सूत्रसंचालन केले. कला शिक्षक श्री श्रीनाथ कुळे सर यांनी आभार मानले.त्यांनी केलेले फलक लेखन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. इयत्ता 5वी ते 12 वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. वैयक्तिक व सांघिक खेळात विद्यार्थी उत्स्फूर्त सहभाग घेतला















