मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित, नॅशनलमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा
दापोली : मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोली मध्ये अल्पसंख्यांक दिन साजरा करण्यात आला.
अल्पसंख्यांक दिनाचे औचित्य साधून चित्रकला, निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशालेचे सांस्कृतिक विभागप्रमुख सलमान मोमीन यांनी अल्पसंख्यांक विषयी कायदे, माहिती व अल्पसंख्यांक समाजामध्ये जैन, मुस्लिम, बौद्ध, शीख, पारशी व ख्रिश्चन या समाजाचा समावेश होतो याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. रियाज म्हैशाळे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून अथवा पुस्तकातून अल्पसंख्यांक विषयी माहिती व कायदे समजावून घ्यावे. असे सलमान मोमीन यांनी सांगितले. प्रशालेचे मुख्याध्यापक अय्युब मुल्ला यांनी अल्पसंख्यांक दिनाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.















