कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि तिच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि तिच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कल्याण– कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली आहे. शेगाव येथून पोलीस पथकाने आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल गवळी पत्नीच्या गावी लपून बसला होता. पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळीला अखेर पोलिसांनी पकडलं आहे. कल्याण पोलिसांची सहा पथकं त्याच्या मागावर होती. शेगाव येथून पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतलं. विशाल गवळी पत्नीच्या गावी लपून बसला होता. अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण कल्याणला हादरवून सोडलं आहे. नागरिकांच्या मनात या घटनेवरुन प्रचंड रोष आहे. सोमवारी संध्याकाळी कल्याण कोळसेवाडी परिसरातून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह काल दुपारी कल्याण भिवंडी मार्गावरील बापगाव परिसरात एका कब्रस्तानमध्ये सापडला. कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी विशाल गवळी, त्याची पत्नी साक्षी गवळी आणि रिक्षाचालकाला अटक केली. रिक्षा चालकाला कालच अटक केली होती. तर साक्षीची काल राहत्या घरातून अटक करण्यात आली होती आणि विशालच्या आज बुलढाण्यातून मुसक्या आवळण्यात आल्या. साक्षीला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तिला कोर्टाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर साक्षीने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिने या गुन्ह्याचा संपूर्ण घटनाक्रमच पोलिसांना सांगितला. विशाल गवळी हा संध्याकाळी 5 वाजता मुलीला घरी घेऊन आला होता. त्यानंतर त्याने तिच्याशी गैरकृत्य केलं आणि नंतर तिची हत्या केली. तिची हत्या केल्यानंतर त्याने एका मोठ्या बॅगेत तिचा छिन्नविछिन्न मृतदेह ठेवला होता. त्यानंतर साक्षी ही संध्याकाळी 7 वाजता घरी आली. साक्षी एका खासगी बँकेत नोकरीला आहे. साक्षी घरी आली तेव्हा विशालने झालेला प्रकार तिला सांगितला. हा प्रकार ऐकून ती हैराण झाली होती, असं साक्षीने म्हटल्याचं समजते. त्यानंतर दोघा नवरा बायकोने एकत्र बसून मृतदेहाचे काय करायचे याचा विचार केला. त्यानंतर दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली.

त्याआधी दोघांनी घरातील संपूर्ण रक्त पुसून काढले. रात्री 8.30 वाजता विशालने मित्राची रिक्षा बोलावून घेतली. 9 वाजता ते रिक्षात मृतदेह टाकून बापगावच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर त्यांनी बापगावला अज्ञातस्थळी मृतदेह फेकला आणि तिथून पलायन केलं. बापगाववरून परत येत असताना विशालने आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली. त्यानंतर तिथून तो बुलढाण्याला निघून गेला. साक्षी कल्याणमध्येच राहिली. इथपर्यंत सर्व ठिक होतं. पण जेव्हा विशालवर संशय आला तेव्हा पोलिसांनी कसून तपास केला. त्यावेळी विशालच्या घराजवळ पोलिसांना रक्ताचे डाग सापडले. त्यामुळे पोलिसांना हे कृत्य विशालनेच केल्याचं दिसून आलं. त्यानंतर पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेतलं आणि तिची कसून चौकशी केली. तेव्हा तिने या खूनाची सर्व माहिती पोलिसांना दिली.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प

ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प एसटी महामंडळाचा...
Read More
ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प

शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

🌏 शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ वनविभागाची तातडीची कारवाई; अज्ञात शिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू संगमेश्वर-...
Read More
शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकंठ हरपला; वयाच्या ८९व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास मुंबई...
Read More
स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार

IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार मुंबई :...
Read More
IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार

पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट

पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट लोणीकंद परिसरातील घटना; तरुणी मुख्य सूत्रधार, ८ आरोपी अटकेत पुणे :पुणे-अहिल्यानगर...
Read More
पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट

दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप

दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप मेरीटाईम बोर्ड व महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह;...
Read More
दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप

संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना सुखद धक्का; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत लुटला वडापावचा आस्वाद!

संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना सुखद धक्का; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत लुटला वडापावचा आस्वाद! कोकण दौऱ्यावर असताना मंत्र्यांनी केली एसटी...
Read More
संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना सुखद धक्का; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत लुटला वडापावचा आस्वाद!

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत

‘चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील हस्तक्षेपाच्या...
Read More
चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत

विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ

विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ बँक ऑफ इंडियाच्या सॅलरी अकाऊंट विमा योजनेतून परवडी कुटुंबाला...
Read More
विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ

तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न

तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा इंटरनॅशनल पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘तितिक्षा...
Read More
तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न