वेलदूर नवानगर शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची सभा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न

गुहागर – जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ शिक्षक पालक संघ यांची संयुक्तिक सभा आयोजित करण्यात आलेली होती. सर्वप्रथम शाळेच्या उपशिक्षिका सुषमा गायकवाड मॅडम यांनी उपस्थित सर्वांचे शब्द सुमनांनी स्वागत केले. या सभेच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शिल्पाताई कोळथरकर यांची निवड करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्री मनोज पाटील सर यांनी या सभेचे प्रास्ताविक केले. या सभेसाठी नारायण रोहीलकर, शंकरजी कोळथरकर , मनोज पावसकर, मारुती रोहीलकर. सुदाम कोळथरकर, रवींद्र जांभारकर,सुहासिनी रोहिलकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ ,शिक्षक पालक संघ यांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष सर्व सदस्य, पालक या सभेसाठी उपस्थित होते. या शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये बीट स्तरावर व तालुका स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. व तालुकास्तरावरील क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.सभेमध्ये शैक्षणिक सहल, सांस्कृतिक कार्यक्रम, तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा अशा विविध विषयावर सर्वानुमते चर्चा करण्यात आली.शेवटी उपस्थित सर्वांचे सुषमा गायकवाड मॅडम यांनी आभार मानले. व सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.















