मंत्रालयात सर्वसामान्यां च्या प्रवेशावर कठोर निर्बंध! 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मंत्रालयात सर्वसामान्यां च्या प्रवेशावर कठोर निर्बंध! 

मंत्रालयात प्रवेशासाठीची सुरक्षाव्यवस्था अधिक कडेकोट करण्यात येणार असून अभ्यागतां च्या प्रवेशावर कठोर निर्बंध येणार आहेत.अभ्यागतांना ज्या खात्यामध्ये काम आहे, त्याच मजल्यावर प्रवेश मिळणार असून अन्य मजल्यांवर जाता येणार नाही.
मंत्रालयातीलसुरक्षाव्यवस्थे तील बदलांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी उच्च स्तरीय बैठक घेतली. मंत्रालयात येणारे नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुलभपणे प्रवेश मिळावा आणि सुरक्षा भक्कम राहावी, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ते चा उपयोग करण्यात यावा, असे निर्देश श्री.फडणवीस यांनी दिले.

महायुती सरकार सत्तेवर आल्या नंतर मंत्रालयाच्या सुरक्षेचा नव्याने आढावा घेतला जात असून फडणवीस यांनी उच्च स्तरीय बैठक आयोजित केली होती.त्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मुख्य सचिव सुजाता सौनिक,गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. इक्बालसिंग चहल,पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर,विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती आदी उपस्थित होते.राज्यभरातून कामे घेऊन नागरिक मंत्रालयात येतात आणि खूप गर्दी होते.
या वाढत्या गर्दीचा सुरक्षा व्यवस्थे वर ताण पडतो.त्यामुळे अभ्यागतांसह कर्मचाऱ्यांचा प्रवेश सुलभ होऊन सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात येणार आहे.

अत्याधुनिक यंत्रणा
मंत्रालयात प्रवेश करण्यासाठीचा पास देताना अभ्यागताचे छायाचित्र काढले जाते.
आता इमारतीच्या प्रवेश द्वारातही सुरक्षा अडथळे लावण्यात आले असून प्रत्येक व्यक्ती कॅमेरामध्ये दिसेल आणि त्याची ओळख,छायाचित्र व नाव बाजूला असलेल्या मॉनिटरवर येईल व ओळख पटल्यावरच त्याला प्रवेश खुला होईल अशी व्यवस्था प्रत्येक मजल्यावर उभारण्यात येणार असून ज्या मजल्यावर नागरिकांचे काम आहे, त्याला त्या खात्यासाठीच पास दिला जाईल व अन्य मजल्यां वर जाता येणार नाही, अशी यंत्रणा उभारण्यात येत आहे, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या सूचना

नागरिकांच्या मंत्रालय प्रवेश ते बाहेर पडण्याची व्यवस्था यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा.

मंत्रालयातून विधान भवनात कार्यालयीन कामकाजासाठी अधिकारी व कर्मचारी ये-जा करतात. अधिवेशन काळात ही वर्दळ वाढते. या सर्व ठिकाणी कर्मचाऱ्यांना सुरक्षा पास द्यावेत.
मंत्रालय ते विधान भवन भुयारी मार्गाचे काम सुरू असून कर्मचाऱ्यांना तेथून प्रवेशाची सोय उपलब्ध करावी.
मंत्रालयातून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे काही प्रकार झाल्यावर काही वर्षांपूर्वी दुसऱ्या मजल्यावर दोरखंडाची जाळी लावण्यात आली.
तरीही त्यात उड्या मारण्याचे प्रसंग घडल्याने सहाव्या मजल्या सह काही मजल्यांवर लोखंडी जाळी बसविण्याचे काम सुरू झाले.हे काम तातडीने पूर्ण करावे हे काम झाल्यावर दोर खंडाची जाळी काढून टाकण्यात यावी.

मंत्रालय प्रवेशद्वारावर सामानाची चोख तपासणी करण्यात यावी. कुठलीही आक्षेपार्ह वस्तू मंत्रालयात येणार नाही, याची दक्षता घ्यावी.

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न