मातोश्री वर घेतली उद्धव ठाकरे ची भेट, मी नाराज होतो आणि आहे- राजन साळवी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मातोश्री वर घेतली उद्धव ठाकरे ची भेट, मी नाराज होतो आणि आहे, माझ्या भावना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितल्या आहेत; माजी आमदार राजन साळवींचं उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मोठं विधान

 

मुंबई–शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून आहे. विधानसभेत झालेल्या पराभवानंतर राजन साळवी हे शिवसेना ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चा आहेत. राजन साळवी यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर माध्यमांशी बोलताना आपण योग्यवेळी योग्य निर्णय घेणार असल्याचं सूचक विधान केलं होतं. यानंतर आज राजन साळवी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, या भेटीनंतर राजन साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधत मोठं भाष्य केलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर मी नाराज होतो आणि नाराज आहे. मी माझ्या भावना उद्धव ठाकरे यांना सांगितल्या आहेत, असं राजन साळवी यांनी म्हटलं आहे.

 

विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ज्या भावना होत्या, त्या मलाही समजल्या आणि काही लोकांनीही मला त्यांच्या भावना सांगितल्या. मात्र, माझ्या पराभवाला कारणीभूत ज्या घटना आहेत. त्याबद्दल मी नक्कीच नाराज होतो आणि नाराज आहे. माझ्या नाराजीच्या भावना उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. तसेच कार्यकर्त्यांच्या भावना उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी देखील माझ्या भावना ऐकून घेतल्या आहेत, असं राजन साळवी यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून माझ्या प्रवेशासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. या पार्श्वभूमीवर मला कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण यावं आणि संवाद साधावा. मी राजापूर या ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

 

तेव्हा सर्वांनी भावना व्यक्त केल्या की माझ्यावर अन्याय झाला आहे. माझ्या पराभवाला अनेक मंडळी कारणीभूत आहेत. तसेच तुम्ही योग्य तो निर्णय घ्या,अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्यांना मी देखील सांगितलं की, मी योग्यवेळी योग्य निर्णय घेईन, असं राजन साळवी यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. माझ्या पराभवाला काही वरिष्ठ मंडळी कारणीभूत आहेत. मी आज त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही. मात्र, कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे. आज पक्षावर आणि माझ्यावरही दु:खाचा डोंगर आला. यासाठी कोण कारणीभूत आहे हे शोधणं गरजेचं आहे. जर शोधलं नाही तर आता माझ्यावर जी वेळ आली, तीच वेळ भविष्यात आणखी कोणावर येऊ शकते. मात्र, अशी वेळ येऊ नये, यासाठी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आणि मी योग्यवेळी योग्य निर्णय घ्यायला सक्षम आहे, असं राजन साळवी यांनी म्हटलं होतं.

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के