शासन अलर्ट मोड वर मुंबई बोलावली आरोग्य विभागाची बैठक

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

खबरदारीचे उपाय करण्यासाठी आरोग्य

विभागाने गुरुवारी मुंबईत बोलावली बैठक

 

मुंबई :- कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील बाप्टिस्ट रुग्णालयात दोन ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (Human metapneumovirus – HMPV) बाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात तीन महिन्यांची चिमुरडी आणि आठ महिन्यांचा चिमुरडा यांचा समावेश आहे. खासगी लॅबच्या अहवालांआधारे दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप कर्नाटकच्या सरकारी लॅबने दोन्ही रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी केलेली नाही.

 

पण बंगळुरूत ह्युमन मेटान्यूमोव्हायरसबाधीत रुग्ण आढळताच देशभर सरकारी यंत्रणा जागी झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने गुरुवारी ह्युमन मेटान्यूमोव्हायरस संदर्भात खबरदारीचे उपाय करण्यासाठी मुंबईत बैठक बोलावली आहे.

 

महाराष्ट्रात अद्याप ह्युमन मेटान्यूमोव्हायरसबाधीत एकही रुग्ण आढळलेला नाही. पण खबरदारीचे उपाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लवकरच उत्तर प्रदेशमध्ये कुंभमेळा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारनेही खबरदारीचे उपाय करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. सध्या ह्युमन मेटान्यूमोव्हायरसबाधीत सर्वाधिक रुग्ण चीनमध्ये आहेत. त्यामुळे चीनमधून येणाऱ्या नागरिकांना भारतात थेट प्रवेश देऊ नये. चीनमधून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची वैद्यकीय तपासणी करावी, अशीही मागणी होऊ लागली आहे. या संदर्भात लवकरच केंद्र सरकार धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे.

ह्युमन मेटान्यूमोव्हायरसची कमी जास्त प्रमाणात बाधा झाल्यामुळे इन्फ्लूएंझा ए, एचएमपीव्ही, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, कोविड-१९ असे वेगवेगळे संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका असतो.

 

सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरसला आळा घालण्यासाठी लस अस्तित्वात नाही. तसेच मानवी मेटान्यूमोव्हायरसची बाधा झाल्यास बरे करण्यासाठी एकही ठोस औषध उपलब्ध नाही. रुग्णाला मानवी मेटान्यूमोव्हायरसची बाधा झाली तर सुरुवातीला सर्दी – खोकला, ताप अशी सामान्य लक्षणे दिसतात आणि हळू हळू परिस्थिती बिघडते.

 

पण या संकटावर मात करण्यासाठी उपाय सापडलेला नाही. या पार्श्वभूमीवर तब्येतीची काळजी घ्या, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने नागरिकांना केले आहे.

 

???? हे करा.

 

खोकताना किंवा शिंकताना नाकातोंडासमोर हातरुमाल, टिश्यू पेपर धरा

बाहेरून आल्यावर तसेच खोकल्यावर, शिंकल्यावर, लिक्विड सोप किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझर अथवा साबण आणि पाणी यांचा वापर करून हात स्वच्छ धुवा

ताप, सर्दी, खोकला, शिंका अशा स्वरुपाचा त्रास वारंवार होत असल्यास वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार करा आणि गरजेशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा.

 

तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कने नाक – तोंड झाकून घ्या.

पुरेसे पाणी प्या. सकस आहार घ्या.

वास्तव्याच्या आणि कामाच्या ठिकाणी हवा खेळती राहील याची खबरदारी घ्या.

 

???? हे करू नका..

 

हस्तांदोलन

हातरुमाल, टिश्यू पेपर यांचा पुनर्वापर रुग्णाशी जवळचा संपर्क

डोळे, नाक, तोंड यांना वारंवार स्पर्श करणे

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे

वैद्यकीय सल्ल्याशिवाय स्वतःच औषधोपचार करणे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न