तळवली प्रो कबड्डी पर्व 5 चा विजेता पारमी पलटण तर उपविजेता सुफयान वॉरियर्स

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तळवली प्रो कबड्डी पर्व 5 चा विजेता पारमी पलटण तर उपविजेता सुफयान वॉरियर्स

नवी मुंबई (मंगेश जाधव)

तालुक्यातील तळवली येथे आयोजित प्रो कबड्डी स्पर्धा पर्व 5 चे विजेतेपद पारमी पलटण – संघ मालक पारमी ॲप तर उपविजेतेपद सुफयान वॉरियर्स – संघ मालक इम्रान शेठ घारे यांनी पटकाविले.
मा. संजय शेठ पडवळ पुरस्कृत सेव्हन स्टार कबड्डी संघ तळवली आयोजित पंचक्रोशी मर्यादित, प्रो कबड्डी स्पर्धा पर्व 5 चे आयोजन दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये संघमालक इम्रानशेठ घारे यांचा सुफयान वॉरियर्स, सागर हातीस्कर यांचा एचडी फायटर्स, साईप्रसाद गावडे व सुदेश वेद्रे यांचा देवांश वॉरियर्स, हेमंत चव्हाण व दिलीप आग्रे यांचा शिवनेरी पलटण, दीपेश व शुभम शिगवण यांचा सुकाई फायटर्स तर पारमी ॲप (प्रतिनिधी सम्यक गमरे) यांचा पारमी पलटण असे 6 संघ सहभागी झाले होते.

तळवली प्रो कबड्डी पर्व 5 चा विजेता पारमी पलटण तर उपविजेता सुफयान वॉरियर्स

तळवली पंचक्रोशी मध्ये अतिशय नावाजलेली ही प्रो कबड्डी स्पर्धा आंतरराष्ट्रीय खेळाडू, ब्लॅक बेल्ट प्रमोद रामचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या स्पर्धेसाठी मुख्य अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रमोद पवार, फुटबॉल चे नॅशनल खेळाडू शैलेश गमरे, कबड्डीचे राष्ट्रीय पंच व ज्युनिअर कॉलेज पाटपन्हाळे चे प्राध्यापक संजीव मोरे, माजी सैनिक सुनिल जाधव, उपस्थित होते. तर मान्यवर म्हणून तळवलीच्या सरपंच सौ. मयुरी शिगवण, पोलीस पाटील विनोद पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राकेश पवार, निगुंडळ गावचे पोलीस पाटील प्रकाश आंबोकर, श्री सुकाई देवी ग्रामदेवता मंडळ तळवली चे अध्यक्ष गणपत शिगवण, सचिव प्रदीप चव्हाण, प्राध्यापक अमोल जड्याळ, तळवलीचे शिक्षक प्रवीण केळस्कर, संजय कुळे, प्रभाकर कांबळे, श्रीनाथ कुळे, चिपळूण येथून प्राथमिक शिक्षक सुमित उफाड, नवनाथ घाटुळ, दिनेश रोडे, सेवार्थ फाऊंडेशन पुणे चे संचालक संदीप चव्हाण, तळवलीचे ॲड. संतोष आग्रे, सुभेदार प्रशांत शिगवण, पत्रकार आशिष कारेकर उपस्थित होते.
सुरुवातीला उपस्थित मुख्य अतिथी यांचेमार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शैलेश गमरे, प्रा.संजीव मोरे, प्रमोद पवार यांनी फित कापून स्पर्धेचे उद्घाटन केले तर श्रीफळ वाढवून सरपंच मयुरी शिगवण यांनी मैदानाचे उद्घाटन केले.
अतिशय चुरशीच्या झालेल्या या सामान्यांनी क्रीडारसिकांची मने जिंकली. अखेरच्या झालेल्या चुरशीच्या सामन्यात पारमी पलटण ने 2 गुणांनी विजय मिळवून विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाला रोख रुपये 8000/-, चषक व प्रत्येक खेळाडूला मेडल, उपविजेत्या संघाला रोख रुपये 7000/-, चषक व प्रत्येक खेळाडूला मेडल तर उत्कृष्ट खेळाडू – प्रणय मुकनाक ( पारमी पलटण) याला रोख रुपये 1000/-, मेडल व चषक, उत्कृष्ट चढाई – साहिल घारे (सुफयान वॉरियर्स) याला रोख रुपये 500/-, मेडल व चषक, उत्कृष्ट पकड – स्वयम आंबोकर ( पारमी पलटण) याला रोख रुपये 500/-, मेडल व चषक देवून गौरविण्यात आले. तर सहभागी संघमालक यांना सन्मानचिन्ह चषक देवून सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे समालोचन प्रशांत गावडे, प्रदीप चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन शिक्षक संजय कुळे, प्रभाकर कांबळे व प्रा.अमोल जड्याळ यांनी केले. या स्पर्धेचे आयोजन व संपूर्ण व्यवस्थापन सेव्हन स्टार कबड्डी संघ तळवलीच्या वतीने करण्यात आले. यासाठी विशेष मेहनत सेव्हन स्टार चे व्यवस्थापक पत्रकार उत्तम पवार, खेळाडू केतन शिगवण, समीर गीजे, अभिषेक सांगळे, अतुल आग्रे, नितीन बेंडल, नयन शिगवण, सुरज गीजे, साहिल भातडे यांनी घेतली. संपूर्ण स्पर्धा रत्नागिरीतील पहिले रजिस्टर यु-ट्यूब चॅनल स्वामी इव्हेंटस् गुहागर च्या माध्यमातून लाईव्ह दाखविण्यात आल्याने महाराष्ट्रभरातून अनेक क्रीडा रसिकांना हा कबड्डीचा थरार पाहता आला.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न