कोळवली पंचक्रोशीचे नेते दिवंगत एस. डि. पवार यांचे मानसपुत्र आणि संत निरंकारी महात्मा थोर विभूती भरतजी डिंगणकर यांचा ६० वा जन्मदिन उत्साहात साजरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोळवली पंचक्रोशीचे नेते दिवंगत एस. डि. पवार यांचे मानसपुत्र आणि संत निरंकारी महात्मा थोर विभूती भरतजी डिंगणकर यांचा ६० वा जन्मदिन उत्साहात साजरा

कोळवली पंचक्रोशीचे नेते दिवंगत एस. डि. पवार यांचे मानसपुत्र आणि संत निरंकारी महात्मा थोर विभूती भरतजी डिंगणकर यांचा ६० वा जन्मदिन उत्साहात साजरा

आबलोली (संदेश कदम) 

गुहागर तालुक्यातील कोळवली गावचे सुपुत्र आणि कोळवली पंचक्रोशीचे नेते दिवंगत एस. डी. पवार साहेब यांच्या कोळवली पंचक्रोशीतील विद्यार्थांना शैक्षणिक दालन ऊभे करुन शैक्षणिक सेवा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणारे आणि आरोग्य सेवा कोळवली पंचक्रोशीत उपलब्ध होण्यासाठी प्रसंगी अनेक लढे व आंदोलने लढणारे एस. डि. पवार साहेब यांच्या प्रत्येक लढ्यात आणि आंदोलनात तन,मन,धन अर्पीणारे एस. डि. पवार साहेब यांचे मानसपुत्र आणि गुहागर तालुक्यातील मोंभार गावचे सुपुत्र आणि संत निरंकारी मंडळ या मंडळाचे महात्मा महान विभूती भरतजी डिंगणकर यांचा जन्म १० जानेवारी १९६५ साली गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा (मोंभार) या दुर्गम आणि डोंगराळ भागात झाला. त्यावेळी घरची परिस्थिती अतिशय हालाखीची होती परंतू आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून आपल्या पंचक्रोशीतील विद्यार्थांचा शैक्षणिक विकास झाला पाहिजे यासाठी तन,मन,धन अर्पीणारे महात्मा महान विभूती भरतजी डिंगणकर यांचा ६० वा जन्मदिन मुंबई येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव, महेश गोवळकर,महात्मा दत्तकुमार शिगवण, महात्मा चंद्रकांत कुळ्ये, पाचेरी सडा (मोंभार) महात्मा कृष्णा साळवी, महात्मा सिताराम जोशी, महात्मा रमाकांत घडशी, कोळवली पंचक्रोशीचे नेते दिवंगत एस. एस. डी. पवार यांचे कार्यकर्ते संजिवन यादव, प्रकाश जोशी, यांचेसह संत निरंकारी मंडळाचे पाचेरी सडा (मोंभार), भातगाव, याच बरोबर गुहागर तालुक्यातील महात्मा उपस्थित होते. तसेच त्रिमूर्ती सेवा ग्रामविकास मंडळ पाचेरी सडा या मंडळाचे युवा कार्यकर्ते या सर्वांच्या उपस्थितीत महात्मा भरतजी डिंगणकर यांचा जन्म दिवस साजरा करण्यात आला यावेळी सर्वांनी भरतजी डिंगणकर यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले तर काहींनी फोन व्दारे, फेसबुक,हॉटसपव्दारे अभिनंदनाचा वर्षाव केला.

महात्मा भरतजी यांचा जन्म १० जानेवारी १९६५ रोजी गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा (मोंभार) या छोट्याशा गावात झाला खडतर परिस्थितीतही शिक्षण आणि संघर्ष याची तयारी सुरु असताना १९८३ साली भरतजींनी आपल्या कुटुंबासाठी आर्थिक जबाबदारी स्वीकारुन नोकरी पत्करली हे करीत असताना त्यांनी सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक कार्यात तसेच आध्यात्मिक कार्यात स्वतःला झोकून दिले. १९७९ साली त्यांनी आध्यात्मिक प्रवास सुरु केला आ. शंकर गुणाजी डिंगणकरजी(दाढी महाराज) यांच्या प्रेरणेने त्यांनी संत निरंकारी मिशन जोडले आणि मिशनची सेवा हेच आपल्या जीवनाचे ध्येय मानले १९८६-८७ साली त्यांनी सांताक्रूज येथे सेवा दल युनिट क्रमांक २१२ मध्ये सेवा देणे सु हररु केले त्यांच्या या परोपकारी वृत्तीमुळे सत्संग सेवा आणि समाज कार्याला उंचीवर नेले तसेच महात्मा यशवंत गुरवजी, महात्मा देवजी शिगवणजी, दत्तकुमार शिगवणजी यांच्या सहवासाने महात्मा भरतजी डिंगणकर यांनी गावाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा प्रचार आणि प्रसार अविरतपणे चालू ठेवला आहे. या त्यांच्या कार्यात पत्नी सुगंधा डिंगणकर, मुलगा स्वप्नील व समीर डिंगणकर  यांची समर्थ साथ देत आहेत

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

प्रा. जहूर बोट 'सर्वोत्तम विद्यार्थी' पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश शृंगारतळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न; समृद्धीवर...
Read More
प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रविवारी रात्री झालेल्या आयपीएल...
Read More
वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन मुंबई - संदीप शेमणकर  शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, घाटकोपर...
Read More
दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे समुद्री शेवाळ संवर्धन या विषयावर...
Read More
रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी