भारतीय सैन्यदल: स्वदेशीकरणाकडून सशक्तीकरणाकडे गौरवास्पद वाटचाल

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीय सैन्यदल: स्वदेशीकरणाकडून सशक्तीकरणाकडे गौरवास्पद वाटचाल

भारतीय सैन्यदल: स्वदेशीकरणाकडून सशक्तीकरणाकडे गौरवास्पद वाटचाल

 ७७ व्या भारतीय सैन्यदल दिनाचे पुणे येथे १५ जानेवारी रोजी भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे.

पुणे – भारतीय लष्कराने स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या ७७ वर्षाच्या इतिहासात भारताने गतिमान प्रगती करून जगात चौथ्या स्थानापर्यंत मजल मारली आहे. शस्त्रास्त्रांच्या नवनिर्मितीच्या बाबतीत भारताने आपली घोडदौड उत्तम प्रकारे राखून स्वयंपूर्णतेसह निर्यात करण्यावर लक्ष केंद्रित करून ‘स्वदेशीकरणातून सशक्तीकरणाचा’ नारा योग्य ठरवला आहे. भारतीय लष्कराच्या संशोधन, विकास व प्रगतीचा आढावा खाली लेखाच्या साह्याने घेण्यात आला आहे.

 

भारताच्या स्वातंत्र्यानंतर १५ जानेवारी, १९४९ रोजी भारतीय लष्कराची स्थापना झाली. याच दिवशी फिल्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांनी भारतीय लष्कराचे पहिले प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. याच दिवसाचे स्मरण म्हणून १५ जानेवारी हा दिवस ‘भारतीय लष्कर दिन’ अर्थात ‘आर्मी डे’ म्हणून साजरा केला जातो. भारतात इंग्रजांनी सन १८९५ मध्ये लष्कराची स्थापना केली होती. भारतीय लष्कराच्या स्थापना दिनानिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘आर्मी डे’ परेडचा मान यावर्षी पुण्याला मिळाला आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयामार्फत १५ जानेवारी,२०२४ रोजी पुण्यात हा कार्यक्रम आयोजित केला आहे. लष्कर दिनाचा कार्यक्रम दोन वर्षापूर्वीपर्यंत दिल्लीत आयोजित करण्यात येत होता. त्यानंतर सन २०२३ची आर्मी परेड पहिल्यांदा दिल्ली बाहेर बेंगळुरूमध्ये, तर सन २०२४ची लखनौ येथे आयोजित करण्यात आली होती. आर्मी डे परेडची पुण्याला दुसऱ्या वेळी संधी मिळाल्याने, भारतीय लष्कराचा गौरवशाली इतिहास उजळला जाणार आहे. या ठिकाणी देशाच्या संरक्षण क्षेत्राची क्षमता आणि आत्मनिर्भर होण्याच्या प्रवासाचा वेध घेतला जाणार आहे. पुणे शहरात भारतीय सैन्यदलाच्या ७७व्या वर्धापन दिनानिमित्ताने १५ जानेवारी रोजी लष्करी शस्त्रास्त्रांचे संचलन होणार आहे. आळंदी मार्गावरील बॉम्बे सॅपर्सच्या विस्तीर्ण मैदानावर हा कार्यक्रम आयोजित केला आहे. भारतीय लष्कराने युद्धभूमीचे आधुनिक स्वरूप ओळखून आपल्या शास्त्रास्त्रात काळानुरूप बदल केले आहेत. प्रथमच आत्मनिर्भर भारताचे दर्शन सर्वांना होणार असून, यात अत्याधुनिक भारतीय बनावटीची शस्त्रे पाहायला मिळणार आहेत. आता रणभूमीवर सैनिकांऐवजी द्रोण आणि रोबोट दिसणार असल्याने, त्या स्वरूपाचे अत्याधुनिक प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. शनिवार दि.११ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या अशाच स्वरूपाच्या संचलन व प्रदर्शनाला मा. भारतीय लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी उपस्थित होते, तर बुधवार दि.१५ जानेवारी या भारतीय लष्कर दिनाच्या मुख्य समारंभाला भारताचे मा. संरक्षण मंत्री राजनाथसिंह उपस्थित राहणार आहेत.

 

१५ जानेवारीच्या मुख्य कार्यक्रमांमध्ये भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन व अभ्यासपूर्ण चित्ररथांचे संचलन होणार आहे. भारतीय सैन्यदलाशी संबंधित महिला पुरुष आणि छात्र सैनिकांच्या विविध बटालियन संचलनात सहभागी होणार आहेत. ‘ *स्वदेशीकरण ते सशक्तीकरण’* या प्रमुख आशयावर आधारित नाविन्यपूर्ण चित्ररथांमध्ये मिशन ऑलिंपिक….भारतीय सेना, समर्थ भारत….सक्षम सेना, पूर्व सैनिक…. सर्वदा प्रतिबद्ध, कार्बन तटस्थता…. प्रयास सेना (कार्बन नेचर आर्मी) याविषयीच्या सखोल माहितीचा समावेश असणार आहे. भारतीय बनावटीच्या आधुनिक शस्त्रास्त्रांमध्ये सामान्य नागरिकांना न पाहता येणारी खालील शस्त्रास्त्रे या प्रदर्शनात सहज पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

 

*१. स्वाती पर्वत WLR रडार यंत्रणा:* भारतीय लष्कराने स्वदेशात विकसित केलेले वेपन लोकेटिंग रडार (WLR-M) हे बंगळुरूमधील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने तयार केले आहे. स्वाती रडार दोन आवृत्तीमध्ये बनवण्यात आले असून स्वाती मैदाने (WLR) आणि स्वाती पर्वत (WLR-M) अशी दोन प्रकारची त्याची रचना आहे. स्वाती मैदाने रडार सपाट भूपृष्ठावर कार्यरत राहून अनेक ठिकाणी तैनात केलेल्या शस्त्रांपासून एकाच वेळी कार्य करण्यास सक्षम बनवते. जमिनीवरील हवामानाची परिस्थिती, ग्राउंड क्लस्टर आणि हवाई वस्तू यासारख्या विविध कारणांमुळे परत आलेल्या सिग्नलच्या उच्च गणती व प्रभावीपणे प्रक्रिया करून मिशनच्या यशासाठी रियल टाईम माहिती प्रदान करण्याची क्षमता यामध्ये आहे. स्वाती पर्वत रडारमध्ये उच्च पर्वतीय आणि अतिउंचीच्या प्रदेशांमध्ये ऑपरेशनसाठी डिझाईन केलेले हे रडार असून मोटार सेल्स रॉकेट शोधण्यात आणि प्रोजेक्टचा मागोवा घेण्यास सक्षम आहे. पक्षी, गोंधळ आणि विमानासारखे अवांचीत सिग्नल नाकारून, प्रक्षेपित आणि अप्रक्षेपित प्रकारांचे वर्गीकरण करते. दोन्ही रडार यंत्रणा ट्रांजेक्टरी डेटा संचयित करण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी चांगल्या समन्वयासाठी सुसज्ज आहे. दोन्ही स्वाती रडार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्कॅन केलेले फेजड-रे असून यातून गोळीबार, तोफा आणि रॉकेट असे एकत्रित हल्ले(अटॅक) करता येतात, युद्धभूमीवर अनेक प्रकारे एकाच वेळी काम करण्यासाठी ही उपयुक्त रडार यंत्रणा आहे.

 

२. रोबोटिक डॉग म्युल:

भारतीय लष्कराने रोबोटिक डॉग वापरास सुरुवात केली असून या रोबोटिक डॉगची उंची, लांबी व रुंदी १ मीटर असून हे डॉग सुमारे ९० किलो वजन उंच आणि डोंगराळ भागात वाहून नेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. १० वर्षापर्यंत वापर होऊ शकणाऱ्या या डॉगचा वापर निगराणी आणि लॉजिस्टिकसाठी उपयुक्त ठरत आहे.

 

. 96 ATOR (ऑल टेरेन ऑबस्टॅकल रिकनेसंस):

भारतीय लष्करातील 96 ATOR N1200 ही स्पेशल मोबिलिटी व्हेईकल आहे. हे वाहन वाळवंट, पाणी आणि बर्फ या ठिकाणी वेगवान प्रवास करू शकते. बर्फाच्छादित पर्वतापासून ते खडबडीत भागापर्यंत तसेच दलदलीत हे हायटेक वाहन केवळ लष्करी ऑपरेशनची क्षमता वाढवत आहे. यामध्ये ९ व्यक्ती बसण्याची क्षमता असून, वाहनाच्या इंजिनवर कोणत्याही हवामानाचा विशेष परिणाम होत नाही. या वाहनाचा वेग ४० कि.मी. असून पाण्यामध्ये सहा किमी वेगाने चालू शकते. १,२०० किलो वजन वाहून नेण्याची क्षमता असून, २,३०० किलो वजन खेचण्याची क्षमता या वाहनामध्ये आहे. इंधन क्षमतेसाठी विशिष्ट रचना असून सुमारे, अडीच दिवस हे वाहन सलग प्रवास करू शकते.

 

४. वज्र रणगाडा: हा स्वयंचलित रणगाडा असून, जमिनीसह आकाशातून आलेल्या शत्रूंच्या हल्ल्याचा अचूक वेध घेतो. प्रगत तोफखान्यातील हा महत्त्वाचा भाग असून ४० किमी अंतरापर्यंत याची वेध घेऊ मारा करण्याची क्षमता आहे. शत्रूंचे द्रोण सिग्नल शोधून निकामी करून, द्रोणशी संबंधित दोन ऑपरेटरमधील संवादामध्ये व्यत्यय आणण्याचे काम याकडून केले जाते.

 

*५.पिनाका मिसाईल सिस्टम:* डीआरडीओ आणि भारतीय लष्कराने संयुक्तरित्या विकसित केलेल्या पिनाका मिसाईलने लक्षवेध करता येते. पिनाका मिसाइल सिस्टम ही ४४ सेकंदामध्ये १२ मिसाईल लॉन्च करू शकते म्हणजे प्रत्येक चार सेकंदाला एका मिसाईलची लॉन्चिंग होऊ शकते. याची मारक क्षमता ही ७ किमी पासून ९० किमी पर्यंत आहे.

यासोबतच या प्रदर्शनामध्ये *अँटी टॅंक गायडेड मिसाईल* हे आधुनिक तांत्रिक युद्धभूमीसाठी तयार केलेले अत्याधुनिक वाहन असून, या वाहनावर क्षेपणास्त्र सज्ज आहे. शत्रूकडून होणाऱ्या अवकाश हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य यामध्ये आहे. *एटीव्ही* उंच सखल व खडबडीत जागेमध्ये गतीने धावू शकणारे हे एक सामरिक वाहन आहे. अवघड भूभागामध्ये सैन्याला दिशा देण्याचे काम हे वाहन करते. हे उपयुक्त लढाऊ वाहन असून, यावरील तोफा अवकाशातील चार किमी टप्प्यातील वेध घेऊ शकतात. हे लढाऊ वेगवान वाहन आहे. *अँटी टॅंक गायडेड मिसाईल* शत्रूच्या अवकाश हल्ल्यांना चोख प्रत्यूत्तर देण्याचे सामर्थ्य अँटिक गायडेड मिसाईलमध्ये आहे. या अत्याधुनिक वाहनांमध्ये तांत्रिक युद्धभूमीसाठी खास विचार करून तयार करण्यात आले असून ते क्षेपणास्त्र सज्ज आहे. *मोबाईल कम्युनिकेशन नोड* भारतीय लष्कराने मोबाईल कम्युनिकेशन नोड तातडीच्या तैनाती करता खडतर प्रयत्नातून बनविलेले असून, विविध घडामोडींवर त्वरित संपर्क साधण्यासाठी किंवा लक्ष वेधण्यासाठी याचा बहुमोल उपयोग होतो. *ड्रोन जॅमर सिस्टीम* शत्रुने सोडलेले ड्रोन शोधून काढण्यासाठी, त्यांना अवकाशामध्येच किंवा जमिनीवर विशिष्ट ठिकाणी रोखण्यासाठी व नष्ट करण्यासाठी कोणत्याही वातावरणामध्ये उपयुक्त असणारे अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज असे हे वाहन आहे. ग्लोबल फायर पॉवर मिलिट्री स्ट्रेंथने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत शक्तिशाली लष्करामध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारताने लष्करी साहित्याच्या निर्यातीत मोठी आघाडी घेतली असून अमेरिका, फ्रान्स व आर्मेनिया हे देश भारतीय लष्करी साहित्याचे सर्वोच्च तीन खरेदीदार बनले आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये या तिन्ही देशांना भारताने २१,०८३ कोटी रुपयांचे(२.६ अब्ज डॉलर) लष्करी साहित्य निर्यात केले आहे. सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातील कंपन्यांनी घातक शस्त्रास्त्रे जवळपास १०० देशांना निर्यात केली आहेत. या शस्त्रास्त्रांमध्ये ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्र, डॉर्निअर-२८८ लढाऊ विमाने, तोफा, रडार, आकाश क्षेपणास्त्रे, पिनाक रॉकेट सिस्टीम, चिलखती वाहने इत्यादींचा समावेश आहे. भारताची स्वदेशीकरकडून सशस्त्रीकरणाकडे होणारी वाटचाल प्रगती पथावर नेणारी आहे, याचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे.

*भारत माता की जय!…. वंदे मातरम!*

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

प्रा. जहूर बोट 'सर्वोत्तम विद्यार्थी' पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश शृंगारतळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न; समृद्धीवर...
Read More
प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रविवारी रात्री झालेल्या आयपीएल...
Read More
वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग