सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराच्या मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या; ठाण्यातून केली अटक

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अखेर सैफ अली खान वर हल्ला करणारा सापडला 

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराच्या मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या; ठाण्यातून केली अटक

मुंबई–सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या मुंबई पोलिसांनी आवळल्या आहेत. आरोपीला पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे. मोहम्मद आलियान ऊर्फ बी. जे. असे हल्लेखोराचे नाव आहे. विजय दास असे नाव बदलून तो मुंबईत राहत होता. अशी माहिती मिळत आहे.

त्याने सैफ अली खानच्या घरात जाऊन त्याच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली आहे. तो मुंबईतील एका पबमध्ये काम करत होता. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथील मेट्रो बांधकाम साइटजवळील कामगार छावणीतून त्याला अटक करण्यात आली. विलेपार्ले पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ही अटक केली. झोन-६चे डीसीपी नवनाथ ढवळे यांच्या पथकाने आणि कासारवडवली पोलिसांनी संयुक्त कारवाई करून आरोपीला अटक केली आहे. या अटकेसाठी विविध विभागांमध्ये तब्बल 30 टीम तयार करण्यात आली होती. आरोपीचं नाव मोहम्मद अलियान असल्याचं सांगितलं जात आहे. सुरुवातीला त्याने आपलं नाव विजय दास असल्याचं सांगितलं होतं. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीला रविवारी रात्री उशिरा ठाण्यातील हिरानंदानी भागातून अटक केली आहे. चौकशीत त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. पोलिसांनी त्याला मुंबईला आणले असून खास पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरू आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय दास उर्फ मोहम्मद अलियान आधी मुंबईतील एका पबमध्ये काम करीत होता. त्यानंतर तो ठाण्यातील एका बारमध्ये काम करू लागला. पोलिसांनी सैफ प्रकरणातील हल्लेखोर ठाण्यात लपल्याची सूचना मिळाली होती. टीमने ठाणे पश्चिमेकडील हिरानंदानी इस्टेटमधील टीसीएस कॉल सेंटरच्या मागे सुरू असलेल्या मेट्रोच्या ठिकाणी छापा मारला. आरोपी येथील लेबर कॅम्पमध्ये लपला होता. तो सुरुवातीला ठाण्यात हिरानंदनी परिसरात काम करत होता. त्यामुळे त्याला या भागाची संपूर्ण माहिती होती. तो ठाण्यातील लेबर कॅम्पजवळील जंगलात लपून बसला होता. विजय दासने यापूर्वी मुंबईतील एका पबमध्ये काम केल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी विजयला अटक केल्यानंतर आज पोलीस त्याला न्यायालयासमोर रिमांडसाठी हजर करणार आहेत. या कारवाईनंतर आज सकाळी ९ वाजता मुंबई पोलीस अधिकारी पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणातील अपडेट देणार आहेत

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न