पन्हळे येथील तो मदरसा अनधिकृतच , राजापूर तहसिलदारांची माहीती मदरशाकडे नोंदणी प्रमाणपत्राशिवाय अन्य कोणतीही परवानगी नाही – तहसीलदार विकास गंबरे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पन्हळे येथील तो मदरसा अनधिकृतच , राजापूर तहसिलदारांची माहीती

मदरशाकडे नोंदणी प्रमाणपत्राशिवाय अन्य कोणतीही परवानगी नाही – तहसीलदार विकास गंबरे

राजापूर -(प्रतिनिधी -पुरुषोत्तम खंबाळ)
राजापूर शहरालगतच्या धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरसा प्रकरणात स्थानिक प्रशासनाची बोटचेपी भूमिकाच कारणीभूत असल्याची माहिती आता पुढे आली आहे. केवळ धर्मादाय आयुक्तांकडे असलेल्या संस्थेच्या नोंदणी व्यतिरीक्त मदरसा चालविणेबाबत व अन्य बाबींबाबत अन्य कोणतीही परवानगी संबधित मदरसा चालकांकडे नसल्याची बाब उघड झाली आहे. असे असतानाही गेली दिड ते दोन वर्षे स्थानिक ग्रामस्थांनी सदरचा अनधिकृत मदरसा बंद करण्याची वारंवार मागणी करूनही स्थानिक प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करत अशा प्रकारे या ठिकाणी अनधिकृत मदरसा चालविण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांतुन होत आहे.

तर धर्मादाय आयुक्तांकडील या संस्थेची नोंदणी प्रस्तावात पत्ता राजापूर शहरातील आणि मदरसा सुरू धोपेश्वर पन्हळे परिसरात हा काय प्रकार असा सवाल उपस्थित केला जात असून या मदरशात परराज्यातील मुले असून त्यांची संख्या ६० इतकी असल्याची माहिती पुढे आली आहे. अशा प्रकारे राजापुरात येऊन परराज्यातील मुलांनी या मदरशामध्ये शिक्षण घेण्याचा हा प्रकार नेमका काय आहे याची माहिती प्रशासनाने घ्यावी अशी मागणी होत आहे.

मौजे पन्हळे तर्फे राजापूर या महसुली गावातील अनधिकृत मदरसा हा अत्यंत ज्वलंत तसेच धार्मिक तेढ वाढवणारा विषय असून सदरहु मदरसा कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी येथील ग्रामस्थानी केली आहे.यापुर्वीच्या प्रशासनाच्या आदेशाना न जुमानता हा अनधिकृत मदरसा अद्याप सुरुच असल्याने २६ जानेवारी २०२५ पासुन सदर अनधिकृत मदरसा बंद होईपर्यंत साखळी उपोषण छेडण्याचा ईशारा पन्हळे तर्फ राजापूरच्या ग्रामस्थानी प्रशासनाला दिला आहे. याबाबतचे एक निवेदन स्थानिक ग्रामस्थानी जिल्हाधिकारी यांसह राजापूर तहसिलदाराना सादर केले आहे .

त्यामुळे राजापुरातील या अनधिकृत मदरशाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणात प्रशासनाचे बोटचेपे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिकांतुन होत आहे.

दरम्यान या मदरशा संचालकांकडे मदरशा चालवण्याबाबत कोणतीही परवानगी वा दस्तऐवज नसल्याची बाब पुढे आली आहे. केवळ धर्मादाय आयुक्तांकडे संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र असून या नोंदणी प्रमाणपत्रावर संस्थेचा पत्ता राजापूर शहरातील असून प्रत्यक्षात मदरशाचे कामकाज हे पन्हळे गावातुन चालविले जात असल्याचा अजबच प्रकार पहावयास मिळत आहे.

मदरशा संचालकांकडून नेहमी बंद करण्याच्या आदेशाप्रसंगी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यांचे नुकसान होऊ नये असे सांगून वेळ मारून नेली जात आहे. मात्र या ठिकाणी असणारे व शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी हे परराज्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे. स्थानिक केवळ एक ते दोन मुले असून परराज्यातील या एकूण विद्यार्थ्यांची संख्या ६० असल्याचे पुढे आले आहे. या परराज्यातील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी अनधिकृत मदरशा चालविण्याचा एवढा अट्टाहास या संस्थेकडून का केला जात आहे असा सवाल स्थानिकांतुन उपस्थित केला जात आहे.

नोंदणी प्रमाणपत्राशिवाय अन्य कोणतीही परवानगी नाही-तहसीलदार विकास गंबरे

या मदरशा संचालकांकडे संस्थेच्या नोंदणी व्यतिरीक्त अन्य कोणताही परवाना वा दस्तऐवज नसल्याची माहिती खुद्द राजापूर तसीलदार विकास गंबरे यांनी दिली आहे. या मदरशातील विद्यार्थी संख्या, त्यांचे वास्तव्य तपासण्याबाबत पोलीस प्रशासनाला सुचना देण्यात आल्याचेही गंबरे यांनी सांगितले. सदरची जागा ही संस्थेच्या नावे खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव संबधितांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविलेला असल्याचेही गंबरे यांनी सांगितले. तर या मदरशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबतचा अहवालही सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याचे गंबरे यांनी सांगितले.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न