पुनर्मोहरामुळे आंबा बागायतदार धास्तावले, नैसर्गिक संकटामुळे आंबा पीक धोक्यात?

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुनर्मोहरामुळे आंबा बागायतदार धास्तावले, नैसर्गिक संकटामुळे आंबा पीक धोक्यात?

रत्नागिरी-(वार्ताहर ) हवामानात सतत होणाऱ्या बदलामुळे आंबापिकावर संक्रांत आली आहे. थंडी, कडकडीत ऊन, उष्मा या संमिश्र हवामानाचा परिणाम झाल्याने तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शिवाय पुनर्मोहर सुरू झाल्याने बागायतदार धास्तावले आहेत.

खत व्यवस्थापनापासून आंबा पीक बाजारात येईपर्यंत लाखो रूपये खर्च करावे लागतात. त्यातच नैसर्गिक संकटामुळे पीक धोक्यात येऊन बागायतदारांना याचा फटका बसत आहे.यावर्षी पावसाळा नोव्हेंबरपर्यंत लांबला. ऑक्टोबर हीट जाणवलीच नाही. जमिनीतील ओलाव्यामुळे पालवी मोठ्या प्रमाणावर आली, डिसेंबरमध्ये थंडी वाढताच काही झाडांना मोहोर आला. त्यामुळे एकाच झाडाला पालवी व मोहर अशी संमिश्र स्थिती होती. काही ठिकाणी फुलोरा मोठ्या प्रमाणावर आला. परंतु अपेक्षित फळधारणा झाली नाही. निव्वळ मोहर राहिला, फळधारणा न झाल्यामुळे मोहर वाळला व काड्या शिल्लक राहिल्या आहेत. फळधारणा झालेल्या ठिकाणीच पुनर्मोहर सुरू झाल्याने फळे गळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

डिसेंबरमध्ये ‘फेंगल’ वादळामुळे काही ठिकाणी पाऊस झाला, काही दिवस हवेत मळभ होते. कीडरोग, तुडतुडा, थ्रीप्ससाठी हे वातावरण पोषक असल्याने बागायतदारांनी डोकेदुखी वाढली. मोहर व फळांचे संरक्षण करण्यासाठी कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. फवारणीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. अद्याप आंबा पिकाचे चित्र अद्याप अस्पष्टच आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा पिकाचे चित्र धूसर असून, दुसऱ्या टप्प्यातील आंबा मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारात येण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप आंबा हंगाम कसा असेल, याबाबत बागायतदार खात्री देत येत नाही.हवामानातील बदलामुळे पिकाची उत्पादकता खालावली आहे. जिल्ह्यात कृषी विद्यापीठ असूनही आंबा पीक, कीडरोग नियंत्रणाबाबत योग्य संशोधन होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

सर्वेसर्वा- निलेश जाधव, देवरुख

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन