विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे काळाची गरज : पंचायत समिती माजी सदस्य विवेक सुर्वे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे काळाची गरज : पंचायत समिती माजी सदस्य विवेक सुर्वे

वाटद येथे केंद्रस्तरीय विद्यार्थी गुणवत्ताविषयक विविध स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

 रत्नागिरी (प्रतिनिधी निलेश रहाटे)

रत्नागिरी – प्रत्येक राष्ट्राचा पाया हा विद्यार्थ्यांच्या स्वरूपात ग्रामीण भागातील व शहरी भागातील प्राथमिक शाळांमध्ये तयार होत असतो. त्या अनुषंगाने या शाळांमधील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाच्या हिताच्या दृष्टीने विविध स्पर्धा ह्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणार असून या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे ही काळाची गरज असल्याचे मत पंचायत समिती रत्नागिरीचे माजी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विवेकजी सुर्वे यांनी व्यक्त केले.

ते रत्नागिरी तालुक्यातील वाटद केंद्रातील केंद्रस्तरीय शिक्षणप्रेमी मंडळी यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणवत्ताविषयक विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरण मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने असे वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. अशा स्पर्धांसाठी आणि शैक्षणिक कामासाठी माझा कायमचा पाठिंबा असणार असून, म्हणूनच अशा उपक्रमासाठी सामाजिक, शैक्षणिक संस्थांसाह समाजातील जाणकार मंडळींनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

रत्नागिरी तालुक्यातील वाटद केंद्राच्या सर्व शाळांमधील शिक्षणप्रेमी मंडळींनी केंद्रस्तरीय विद्यार्थी गुणवत्ताविषयक विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये वाचन, हस्ताक्षर, स्मरण, चित्रकला, स्तोत्र पाठांतर आणि प्रश्नमंजुषा या स्पर्धेचा समावेश होता. यासाठी इयत्ता पहिली ते दुसरी, इयत्ता तिसरी ते चौथी, इयत्ता पाचवी आणि इयत्ता सहावी ते सातवी असे गट निश्चित करण्यात आले होते.

स्पर्धेच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पवार यांच्या शुभहस्ते आणि विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी अनिल पवार यांनी उद्घाटनप्रसंगी या गुणवत्ताविषयक विविध स्पर्धांचे आयोजनांचे कौतुक करतानाच, ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गुणवत्ता असते. तिचा शोध घेणे आवश्यक असल्याने आणि तो शोध अशा स्पर्धांच्या माध्यमातून पूर्ण होतो म्हणून या स्पर्धा आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच यावेळी या स्पर्धेच्या अध्यक्षा तथा शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावर यांनीही या स्पर्धा योजनेचे कौतुक करतानाच ह्या स्पर्धा शिक्षण प्रेमी मंडळींनी आयोजित करण्यासाठी घेतलेला पुढाकार हा वेगवेगळ्या अभियानासाठी उपयुक्त ठरणारा असल्याचे सांगून पालक आणि ग्रामस्थ यांचे असेच सहकार्य शाळांना मिळत राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी केंद्रप्रमुख दिपक सुतार यांनी आपल्या मनोगतातून या स्पर्धेच्या उद्देश आणि स्वरूप सांगितले.

या संपूर्ण कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, बाळशेठ जोग, दत्तात्रय बिवलकर, माजी सरपंच अनिकेत सुर्वे, संजय शितप, राम साठे, संजय चाळके, जयेश घवाळी, उदय महाकाळ, शरद सुर्वे, सुरेश धनावडे, यशवंत किंजळे, सुधाकर शिर्के, ग्रामपंचायत सदस्य सचिन ढवळे, सानिका पालये, संदीप भडसावळे, पारकर सिस्टर, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत विद्यार्थ्याना शुभेच्छा देतानाच या स्पर्धांच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.

दिवसभर चाललेल्या या स्पर्धांचे रत्नागिरी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावर यांच्या प्रेरणेने आणि वाटद केंद्राचे केंद्रीयप्रमुख दीपक सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली वाटद केंद्रातील शिक्षणप्रेमी मंडळींनी सर्व शाळांच्या अध्यक्षांच्या सहकार्याने आयोजन केले होते.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उदय रहाटे, नितीन झगडे, शेखर भडसावळे, योगेश सागवेकर, राजेंद्र सुर्वे, सुहास पालये, माधव अंकळगे सर,अश्विनी पवार मॅडम ,शेखर सागवेकर सर,एकनाथ महाकाळ सर,श्रावणी नांदीवडेकर मॅडम,रमेश दुर्गवळी सर ,मनोहर इनामे सर,यांच्यासह वाटद केंद्रातील सर्व शाळांच्या शालेय व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षक, सर्व शिक्षणप्रेमी मंडळी, पालक आणि शालेय पोषण आहार कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.

या स्पर्धेत विजेत्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

???? आणखी बातम्या वाचण्यासाठी आमच्या HOME पेज ले क्लिक करा ????

Nilesh Rahate
Author: Nilesh Rahate

???? निलेश रहाटे ???? मिडिया प्रतिनिधि - रत्नागिरी वार्ताहर. ता. जिल्हा - रत्नागिरी

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग   ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : मराठा मंडळ, ठाणे...
Read More
मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सिंधुरत्न समृद्ध योजनेसाठी ५०० कोटींची मागणी...
Read More
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; 'रॉयल इलेव्हन' कडून विद्यार्थ्यांचा गौरव आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जगभरात हृदयरोग मृत्यूचे...
Read More
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

*श्रीरामपूर शहरवासीयांची* *गत झाली केवीलवाणी!*   *प्यावे लागत आहे चक्क* *दुर्गंधीयुक्त घाण पाणी !!*   ----------------------------------------- श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे...
Read More
श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका : “मराठी माणूस जिंकत असेल तर आम्ही विघ्न...
Read More
मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका
Play sound