शिवसेनाप्रमुख स्मृती क्रिकेट चषकाचा विजेता विश्वकर्मा आबलोली क्रिकेट संघ

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवसेनाप्रमुख स्मृती क्रिकेट चषकाचा विजेता विश्वकर्मा आबलोली क्रिकेट संघ

शिवसेनाप्रमुख स्मृती क्रिकेट चषकाचा विजेता विश्वकर्मा आबलोली क्रिकेट संघ

(उपविजेता सुबहान शृंगारतळी क्रिकेट संघ )

आबलोली (संदेश कदम)

हिंदूहृदय सम्राट वंदनिय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजक सचिन कोंडविलकर , गुड्डू सुबेदार , प्रज्योत जोयशी , प्रविण पवार व मित्रपरिवारतर्फे ओव्हर आर्म क्रिकेट टेनिस चेंडू सहाव्या पर्वातील क्रिकेट स्पर्धा जानवळे बौद्धवाडी मैदानावर नुकतीच संपन्न झाली. श्रीमान बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक ओव्हर आर्म टेनिस क्रिकेट स्पर्धेत विजेता विश्वकर्मा आबलोली क्रिकेट संघ व उपविजेता सुबहान शृंगारतळी क्रिकेट संघ ठरला. विजेत्या क्रिकेट संघाला आकर्षक चषक व रोख रक्कम १५११५ व उपविजेत्या संघाला आकर्षक चषक व रोख रक्कम १११११ रू.चे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.
शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्मृती चषक ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेच्या गौरव समारंभासाठी मान्यवर म्हणून जानवळे गावच्या सरपंच सौ.जान्हवी विखारे , रमेश धामणस्कर , अर्जुन शितप , जानवळे ग्रा.पं.सदस्य मुबीन ठाकूर , आयोजक सचिन कोंडविलकर , पत्रकार निसारखान सरगुरो , दिनेश चव्हाण , सुरेश आंबेकर , सामाजिक कार्यकर्ते अजय खाडे , विजय जानवळकर , पिंट्या संसारे , सुदीप तुप्ते , नथुराम जानवळकर , राकेश रहाटे , संतोष शितप , अंतिम संसारे आदी. मान्यवर उपस्थित होते. आयोजकांतर्फे मान्यवरांचा शाल , सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सदरच्या ओव्हर आर्म क्रिकेट टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये १६ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेतील विजेत्या विश्वकर्मा आबलोली क्रिकेट संघाला रमेश धामणस्कर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक व रोख रक्कम प्रदान करून गौरविण्यात आले . उपविजेत्या सुबहान शृंगारतळी क्रिकेट संघाला आकर्षक चषक व रोख रक्कम जानवळेच्या सरपंच सौ.जान्हवी विखारे व मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. विश्वकर्मा आबलोली क्रिकेट संघातील क्रिकेटपटू शामू साळवी यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला . स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज समिर उर्फ बाळू चव्हाण – सुबहान क्रिकेट संघ शृंगारतळी , उत्कृष्ट फलंदाज चेतन माने – सुबहान क्रिकेट संघ शृंगारतळी , अंतिम सामन्यातील सामनावीर व मालिकावीर अमित पवार – विश्वकर्मा क्रिकेट संघ आबलोली यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक प्रदान करून गौरविण्यात आले.
श्रीमान बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक ओव्हर आर्म टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी पंच म्हणून कैलास पिलणकर व बंधू मोहिते तसेच समालोचक म्हणून साईराज दाभोळकर यांचे उत्कृष्ट सहकार्य लाभले. सदरच्या स्पर्धेसाठी जानवळे गावचे नागरिक , जे.पी.एल जानवळे , गुहागर तालुका क्रिकेट असोसिएशन , गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागर तसेच सचिन कोंडविलकर मित्रपरिवार , क्रिकेट संघ , क्रिकेटपटू , प्रेक्षक यांचे बहुमोल सहकार्य लाभले. गौरव समारंभाचे सूत्रसंचालन जानवळेमधील सामाजिक कार्यकर्ते व क्रिकेटपटू अंतिम संसारे यांनी केले. पत्रकार निसारखान सरगुरो यांनी यंदाच्या सहाव्या पर्वातील श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्मृती चषकाचे आयोजन केल्याबद्दल आयोजक सचिन कोंडविलकर व मित्रपरिवार यांचे तसेच विजेत्या व उपविजेत्या क्रिकेट संघांचे अभिनंदन करून सदर स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन संपन्न झाल्याचे सांगितले. आयोजित क्रिकेट स्पर्धेमुळे क्रिकेटपटूंना उत्कृष्ट खेळाची संधी लाभते .अनेक क्रिकेट खेळाडूंना खेळाचे कौशल्य दाखवता येते असे गौरवोद्गार व्यक्त केले . आयोजक सचिन कोंडविलकर यांनी आयोजित क्रिकेट स्पर्धेसाठी सहभागी क्रिकेट संघ , मान्यवर व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के