स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोठा निर्णय!. सुप्रीम कोर्टाने दिली पुढील तारीख.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोठा निर्णय!.

सुप्रीम कोर्टाने दिली पुढील तारीख.

 

मुंबई  – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून सध्या राज्यात मोठे राजकीय वादळ उठले आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडवला असल्याचे कोर्टात सांगण्यात आले, तरी निवडणुकांच्या तारखांसंदर्भात अनिश्चितता कायम आहे. सुप्रीम कोर्टाने आज, म्हणजे २५ फेब्रुवारीची तारीख निवडणुकीच्या सुनावणीसाठी निश्चित केली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.*

 

सुरुवातीला या प्रकरणाची सुनावणी ५ फेब्रुवारी रोजी होणार होती. मात्र, दिल्लीतील निवडणुकांमुळे ही तारीख पुढे ढकलली गेली. आजच्या सुनावणीत ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून जो गोंधळ निर्माण झाला होता, तो दूर झाल्याचे स्पष्ट झाले. राज्य सरकारने निवडणुका लवकरात लवकर घेण्याची तयारी दर्शवली आहे.

 

*ओबीसी आरक्षणाचा प्रश्न क्लिअर झाला, पण निवडणुका लांबणीवर*

 

राज्य सरकार आणि याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात स्पष्ट केले की, ओबीसी राजकीय आरक्षणाचा विषय आता निकाली निघाला आहे. सर्वपक्षीय सहमती असल्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षात मतभेद नाहीत. मात्र, निवडणुकांच्या तारखा निश्चित करण्यात अजूनही वेळ लागत आहे.

 

*राजकीय वर्तुळात तणाव कायम*

 

राजकीय वर्तुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत तणावाचे वातावरण आहे. निवडणुका लांबणीवर गेल्यामुळे सर्वच पक्षांची तयारी प्रभावित झाली आहे. निवडणुका लांबणीवर जात असल्याने स्थानिक पातळीवर नेतृत्वाला आणखी वेळ मिळेल,अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

*२५ फेब्रुवारीचा निर्णय महत्त्वाचा*

 

२५ फेब्रुवारीच्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेते, यावर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. जर या तारखेला अंतिम निर्णय घेण्यात आला, तर निवडणुका एप्रिल किंवा मेमध्ये घेता येतील. या निर्णयामुळे राज्यातील राजकीय चित्र आणखी स्पष्ट होईल.

 

*निवडणुका वेळेवर होण्यासाठी प्रयत्न सुरू*

 

राज्य सरकारच्या वतीने लवकरात लवकर निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयासमोर भूमिका मांडण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटल्याने निवडणुकीला आणखी काही अडथळा येणार नाही, असे सरकारने सांगितले आहे.

 

*राजकीय आरक्षणाच्या संदर्भातील गुंता संपला*

 

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील प्रमुख मुद्दा राज्य सरकारने न्यायालयात मांडून निकाली काढल्याचे सांगितले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार