होळी गावातील भव्य शोभायात्रेत ‘प्रयागराज कुंभमेळा’ ची रांगोळी विशेष आकर्षण!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

होळी गावातील भव्य शोभायात्रेत ‘प्रयागराज कुंभमेळा’ ची रांगोळी विशेष आकर्षण!

✍️राजू सागवेकर/राजापूर

▪️ राजापूर तालुक्यातील होळी गावात श्री. भरतदुर्गा देवी मंदिराच्या चांदीच्या कलशारोहण सोहळ्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या मंगल प्रसंगी ग्रामस्थांनी भव्य शोभायात्रा आणि सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन केले आहे.

▪️ या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध रांगोळी कलाकार केदार टेमकर यांनी साकारलेली ‘प्रयागराज कुंभमेळा’ ची अप्रतिम रांगोळी. मंदीराच्या प्रांगणात साकारलेली ही भव्य कलाकृती भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

▪️ गावातील नागरिक, भाविक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने या सोहळ्यास हजर आहेत. संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाला अधिकच रंगत आणली आहे.

Raju Sagvekar
Author: Raju Sagvekar

🔴 राजू सागवेकर 🔴 वार्ताहर (ग्रामीण ) - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र ता.राजापुर - 416702

Leave a Comment

आणखी वाचा...