प्रशांत यादव यांनी घेतले देवरूख बाजारपेठ मित्रमंडळाच्या बाप्पाचे दर्शन.
देवरूख ( वार्ताहर)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि चिपळूणमधील वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी आज शनिवारी संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील बाजारपेठ मित्रमंडळाच्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
देवरूख बाजारपेठ मित्रमंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माघी गणेशोत्सवानिमित्त सलग पाच दिवस धार्मिक व सांस्कृतिक अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि चिपळूणमधील वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी देवरूख येथे येवून बाजारपेठ मित्रमंडळाच्या गणरायाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांचा मित्रमंडळाच्यावतीने शाल, श्रीफळ देवून भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष संतोष लाड, नितीन हेगशेट्ये, जया चव्हाण, संदीप दळी, शैलेश भस्मे, अण्णा बेर्डे, जनक जागुष्टे, योगेश वेल्हाळ, ऋत्विक हेगशेट्ये, प्रशांत यादव यांचे स्वीय सहाय्यक गुलजार गोलंदाज व रोहन सकपाळ आदि. उपस्थित होते.















