वेलदूर घरटवाडी शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन व सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वेलदूर घरटवाडी शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन व सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

वेलदूर घरटवाडी शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन व सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

गुहागर (वार्ताहर)– तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेलदूर घरटवाडी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन समारंभपूर्वक साजरा करण्यात आला.

शाळेचे मुख्याध्यापक श्री.रमेश शिंदे सर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी माजी शिक्षण विस्तार अधिकारी (शिक्षण विभाग)माननीय श्री.अशोक गावणकर साहेब, माजी सैनिक श्री प्रभाकर गणपत नायनाक,वेलदूर ग्रामपंचायत उपसरपंच माननीय श्री.राजू गोपाळ जावळे,वेलदूर गावअध्यक्ष श्री. आरकेश अशोक घरट, गाव पाटील श्री.गणपत महादेव धोपट ग्रामपंचायत सदस्या सौ. सायली विवेक घरट,श्रीमती रोहिणी रामचंद्र फणसे,सौ संध्या संजय घरट, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. राजेश धोंडू जावळे.शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्षा सौ.श्रुती योगेश घरट ,शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य,शिक्षक वृंद ,शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ पदाधिकारी महिला मंडळाच्या कार्यकर्त्या व पदाधिकारी ग्रामस्थ ,युवक बहुसंख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसाठी जवळपास 15 देणगीदारांनी बिस्किट पुडे, जिलेबी,चॉकलेट,लाडू असा खाऊ आणलेला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.किरण सूर्यवंशी सर यांनी केले.विद्यार्थी प्रतिनिधी आदित्य पोफळे याने संचलन केले.त्यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते म्हटली.त्यावेळी माजी शिक्षण विस्तार अधिकारी माननीय श्री.अशोक गावणकर साहेब यांचे भाषण झाले व मुख्याध्यापक श्री.रमेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले .आभार प्रदर्शन सौ.मानसी जोशी यांनी केले. दुपारी शाळेत हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. त्यात सर्व पालक महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या. रात्रौ ठीक नऊ वाजता विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून श्री विशाल विक्रांत वैद्य अंजनवेल हायस्कूलचे मुख्याध्यापक मान. श्री. मंगेश गोरिवले सर व हायस्कूलचे शिक्षक वर्ग,शाळेअंतर्गत येणाऱ्या सर्व वाड्यांचे वाडी प्रमुख, श्री.रोहित फणसे( मुंबई मंडळ उपाध्यक्ष) पालक ग्रामस्थ महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते

दरम्यान केंद्र, बीट,तालुका व जिल्हा स्तरावर क्रीडा स्पर्धेत मजल मारलेल्या विद्यार्थ्यांना, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा विजेत्यांना पारितोषिक वितरण व शाळेतील शिक्षकांचा सन्मान कै.महादेव लक्ष्मण घरट व कै.अरविंद धोंडू घरट यांचे स्मरणार्थ सौ. सानिया राजेश धोपट यांचे कडून करण्यात आले. त्यानंतर गणेश वंदना करून सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. 25 कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये ऐतिहासिक लोकगीते,कोळीगीते, रेकॉर्ड डान्स व मनोरंजनात्मक कार्यक्रम यांचा समावेश होता.त्यावेळी प्रेक्षक वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूब माध्यमातून शाळेमार्फत करण्यात आले. मुंबई पुण्यातील बाहेरगावच्या प्रेक्षक वर्गाने सदर कार्यक्रमाचा आनंद घेतला .त्याचे सूत्रसंचालन श्री. प्रभू हंबर्डे व श्री.मंगेश धोपट यांनी केले. कार्यक्रमासाठी भरघोस अशी देणगी पालक वर्गाकडून मिळाली. 30,000 हजार रुपयाची देणगी या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळेला मिळाली,त्या बाबत सर्वांनी आनंद व्यक्त केला. कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मुख्याध्यापक श्री.रमेश शिंदे सर यांनी केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न