धामनंद रोहिदास वाडी येथील सोनाली कदम जिल्ह्यातील गरिबांना ठरत आहे ,आधारवड व देवदूत

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

धामनंद रोहिदास वाडी येथील सोनाली कदम जिल्ह्यातील गरिबांना ठरत आहे ,आधारवड व देवदूत….

धामनंद रोहिदास वाडी येथील सोनाली कदम जिल्ह्यातील गरिबांना ठरत आहे ,आधारवड व देवदूत

कुटुंबाला मिळवून दिलेल्या पेन्शन योजनेमुळे कुटुंबीयांचे अश्रू अनावर

   ▫️ग्रामस्थांनी मानले आभार

खेड:-

खेड तालुक्यातील धामणंद रोहिदास वाडी या वाडीतील सौ.सोनाली संजय कदम ,राहणार -धामणंद रोहिदास वाडी या महिलेने आपल्या वाडीतील तसेच धामणंद गावातील निरक्षर व निराधार असणाऱ्या महिला तसेच अपंग व्यक्ती शासकीय योजनेपासून वंचित आहेत ही गोष्ट त्यांना वारंवार दिसून येत होती. गेली अनेक वर्ष बचत गटामार्फत अनेक महिलांना सोबत घेत त्यांनी महिलांना प्रबोधनाचे काम केलेलं आहे. त्याचबरोबर गावातील महिलांचे प्रतिनिधित्व करीत आहे.

गावातील प्रतिष्ठित व्यक्ती श्री आनंदहीरू कदम यांना सामाजिक क्षेत्राचे आवड असल्यामुळे व त्यांची चिरंजीव श्री संजय आनंदा कदम यांनी ग्रामपंचायती धामण या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेल्या असल्याने खऱ्या अर्थाने सोनाली संजय कदम यांना सामाजिक हितीतून विधायक काम करावं व व समाजातील व गावातील लोकांना अशा योजना मिळवून देऊन त्यांना हातभार करावा असा मानस होता. म्हणूनच हे काम करत असताना त्यांच्या लक्षात आले की, अनेक गावातील कमी शिकलेल्या महिला ज्यांना कोणताही आधार नाही काही अपंग व्यक्ती आहेत त्यांनाही कोणापासून आधार नाही अशा व्यक्तींना काहीतरी आपण करावं असा मानस सोनाली कदम यांचा होता.

सर्व योजनेची योग्य माहिती घेत सर्व निराधार महिला विधवा महिला व अपंग लोकांना एकत्रित करत एक बैठक घरात आयोजित केली. त्यातील आज पर्यंत अनेक महिलांना तसेच अपंग लोकांना त्यांनी पेन्शन मिळून दिली. यामध्ये श्रीम.रंजना रमेश पवार , धामणद, राजवाडा श्रीम.शिल्पा संजय निकम,राजवाडा

श्रीम.रविना रवींद्रगायकवाड,राजवाडा

कु.सचिन दीपक जाधव राहणार जाधववाडी श्री.अनिल अर्जुन जाधव राहणार – जाधववाडी श्री.सुरेश अनंत जाधव राहणार – पायरवाडी

असे शासकीय योजनेचे लाभ दिलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

यामध्ये शासकीय योजनेचा लाभ देत असतानाच राष्ट्रीय कुटुंब लाभाचे सुद्धा याच्यामध्ये लाभ देण्यात आलेले आहे. माननीय तहसीलदार खेळ यांच्या उपस्थितीत सदरचा रक्कम त्यांना अदा करण्यात आलेली आहे.

अशा विधायक आणि लोकांना आधार वाटणाऱ्या आधारवड म्हणून ज्यांची ओळख तयार झालेली आहे ते धामण या गावातील एक महिला सौ सोनाली संजय कदम यांचं कौतुक संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामार्फत करण्यात येत आहे.

त्यांच्याशी बोलण्यात आल्यानंतर लोकांच्या असणाऱ्या अडीअडचणी त्याचबरोबर शासकीय असणारी योजनेची लाभ मिळवून देण्यासाठी मी या गावांमध्ये कायम तत्पर असणार आहे अशा प्रकारचे उद्गार काढले.या उत्तम कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातून खेड तालुक्यातील धामणद रोहिदास वाडी येथील सौ सोनाली संजय कदम यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

Yogesh Pedhambkar
Author: Yogesh Pedhambkar

योगेश पेढांबकर - रत्नागिरी वार्ताहर, चिपळूण-संगमेश्वर, डिजीटल मिडिया प्रतिनिधी

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न