एकनाथ शिंदेंचे कौतूक करताना शरद पवारांची गुगली; दिल्लीतलं वातावरण तापलं…….

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

????रत्नागिरी वार्ताहर 

???? एकनाथ शिंदेंचे कौतूक करताना शरद पवारांची गुगली; दिल्लीतलं वातावरण तापलं

नवीदिल्ली- एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र कसा पुढे जाईल यासाठी प्रयत्न केले. शिवाय त्यावेळी त्यांनी सर्वच पक्षाच्या नेत्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला, अशी कौतूकाची थाप शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना दिली. एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार शरद पवार यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कार वितरणानंतर शरद पवार बोलत होते. दिल्लीत हा सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादीत्य शिंदे ही उपस्थित होते.

यावेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतूक केले. एकनाथ शिंदे यांनी आपली कारकीर्द ठाणे महापालिकेपासून सुरू केली. ज्या दिग्गजांनी ठाण्यात चांगलं काम केलं ते काम एकनाथ शिंदे यांनी पुढे नेलं. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राचा विकास कसा होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. हे करत असताना त्यांनी कधी पक्षाचा विचार केला नाही. सर्वां बरोबर त्यांनी सुसंवाद ठेवला. वेगवेगळ्या प्रश्नांची सोडवणूक त्यांनी त्यांच्या काळात केली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार हा झपाट्याने नागरिकरण होणारा भाग आहे. या भागाच्या प्रश्नांची जाण असलेला नेता कोण असेल याची माहिती घेतली, तर तो नेता एकनाथ शिंदे आहे. असं ही शरद पवार यावेळी म्हणाले. या भागातल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असंही ते म्हणाले. शिंदेंकडून शिंदेंना शिंदेंच्या जावया मार्फत हा पुरस्कार दिला जात असल्याबद्दलही शरद पवारांनी यावेळी आनंद व्यक्त केला. हा एक योगायोग असल्याचेही ते म्हणाले.

सातारा जिल्ह्याने बरेच मुख्यमंत्री दिले आहेत. पहिले मुख्यमंत्री हे धनजीभाई कूपर हे होते. ते मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. पण यावेळी शरद पवारांनी एक आठवण आवर्जून करून दिली. ते म्हणाले यात एक नाव अजून आहे. सातारा जिल्ह्यातील एक नाव आहे ते म्हणजे नांदवे. हे गाव शरद पवारांचं गाव आहे. त्यामुळे मी पण सातारा जिल्ह्याचा आहे असं शरद पवारांनी आवर्जून सांगितलं. मी ही सातारचा तुम्ही सातारचे हे पवारांनी सांगण्या मागचा अर्थ काय? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. दरम्यान साहित्य समेलन दिल्लीत होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. स्वातंत्र्यानंतर दिल्लीत साहित्य संमेलन झालं होतं. त्याला पंडीत जवाहरलाल नेहरू आले होते. त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते. अशी आठवणही सांगितली. त्यामुळे राजधानीत राहाणाऱ्या मराठी माणसासाठी हे संमेलन पर्वणी असल्याचे ते म्हणाले. या मुळे दिल्लीकर मराठी माणूस खुषीत आहेत. ते या संमेलनात पंतप्रधानांच्या भाषणाची वाट पाहात आहेत. सध्या दिल्लीत मराठी साहित्य संमेलनाची चर्चा असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

एकनाथ शिंदेंचे कौतूक करताना शरद पवारांची गुगली; दिल्लीतलं वातावरण तापलं

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

प्रा. जहूर बोट 'सर्वोत्तम विद्यार्थी' पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश शृंगारतळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न; समृद्धीवर...
Read More
प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रविवारी रात्री झालेल्या आयपीएल...
Read More
वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन मुंबई - संदीप शेमणकर  शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, घाटकोपर...
Read More
दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे समुद्री शेवाळ संवर्धन या विषयावर...
Read More
रत्नागिरी-सिंधुदुर्ग समुद्र किनारी ‘सि-विड क्लस्टर’ उपयोगी: डॉ. केतन चौधरी

पाषाणाला लाभले ‘देवपण’; मळण येथील मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांची दगडातील शब्दशः ‘भक्ती

पाषाणाला लाभले 'देवपण'; मळण येथील मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांची दगडातील शब्दशः 'भक्ती' १५ वर्षांची तपश्चर्या: कोदंबी पाषाण आणि लाकडातून साकारल्या...
Read More
पाषाणाला लाभले ‘देवपण’; मळण येथील मूर्तिकार चंद्रकांत धामणस्कर यांची दगडातील शब्दशः ‘भक्ती