लहुजी सेने तर्फे १ मार्च रोजी पुणे येथे अधिवेशन आयोजन, मुख्यमंत्री यांची उपस्थिती…

बीड (नंदकुमार बगाडे पाटील) लहुजी शक्ती सेना बीड, महाराष्ट्र राज्य, यांच्याद्वारे आयोजित केलेल्या मातंग समाज अधिवेशन संदर्भात एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक बैठक बीडमध्ये पार पडली. १ मार्च रोजी पुणे येथे मुख्यमंत्री साहेब यांच्या उपस्थितीत मातंग समाजाचे भव्य अधिवेशन होणार आहे, हे सर्व सदस्यांसाठी एक अत्यंत गौरवशाली क्षण असणार आहे.
या अधिवेशनाच्या तयारीसाठी बीड येथील आडवा बैठक अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. अण्णासाहेब मतकर (रासपा, जिल्हाध्यक्ष बीड) यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते – बालाजी भाऊ गायकवाड (प्रदेश सचिव, लहुजी सेना), नानाभाऊ भिसे (जिल्हाध्यक्ष, लहुजी शक्ती सेना बीड), राजेश कांबळे (मराठवाडा संघटक), विजय चांदणे (लहुजी साळवे विकास परिषद प्रदेशाध्यक्ष), प्रियंका ताई (महिला जिल्हाध्यक्ष), तसेच जिल्हा उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि इतर सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत मातंग समाजाच्या ऐतिहासिक उन्नतीसाठी विविध महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. समाजाच्या विकासासाठी नवीन योजनांचा अवलंब आणि प्रभावी कार्यप्रणालींवर चर्चेची मांडणी करण्यात आली. कार्यकर्त्यांना समाजाच्या समृद्धीसाठी कठोर परिश्रम घेण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रत्येक सदस्याने एकत्र येऊन आपल्या समाजाच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने काम करण्याची शपथ घेतली. मातंग समाजाच्या सशक्तीकरणाच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा सिद्ध होईल, असा विश्वास सर्व उपस्थितांनी व्यक्त
केला.