बेरोजगार तरुणांना मिळणार दरमहा ६ ते १० हजार रुपये! सरकारची नवीन योजना सुरु!!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बेरोजगार तरुणांना मिळणार दरमहा ६ ते १० हजार रुपये! सरकारची नवीन योजना सुरु!!

????पुणे : राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्याकरीता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली असून नोकरी इच्छुक अधिकाधिक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ घेण्याकरिता उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोदणी करावी. प्रत्येक तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित शिबीरातही नोंदणी करता येईल. नोंदणीकृत उमेदवारांना शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांमधील रिक्त जागेकरीता योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी महास्वयंम संकेतस्थळावर ‘सीएमवायकेपीवाय ट्रेनिंग स्कीम’ अंतर्गत असलेल्या जाहिरातींकरीता ऑनलाईन अर्ज करावे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी तसेच वय किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे. तो १२ वी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेला असावा. उमेदवाराचे आधार नोंदणी असावी व उमेदवाराचे आधार संलग्न बॅंक खाते असावे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी हा सहा महिन्याचा राहणार असून उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना प्रतिमाह ६ हजार रुपये, आयटीआय, पदविकाधारकांना ८ हजार रुपये, पदवीधर उमेदवारांना १० हजार रुपये विद्यावेतन शासनामार्फत थेट उमेदवारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उद्योग, स्टार्टअप, शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी ऑनलाईन पद्धतीने रिक्तपदे नोंदविलेली आहेत. त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, वस्तू व सेवा कर विभाग, सह-आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था अशा विविध शासकीय, निमशासकीय कार्यालय, उपक्रमांसह बीव्हीजी इंडिया लि., एस. के. कॉर्पोरेशन अशा अनेक खाजगी आस्थापनांचा समावेश करण्यात आला आहे.

योजनेच्या अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१ रास्ता पेठ पुणे या कार्यालयास प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्र. ०२०-२६१३३६०६ वर संपर्क साधावा, असे आवाहन डुडी यांनी केले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात ‘शिवकल्याण राजा’ कार्यक्रम दिमाखात संपन्न

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात ‘शिवकल्याण राजा’ कार्यक्रम दिमाखात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन...
Read More
श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात ‘शिवकल्याण राजा’ कार्यक्रम दिमाखात संपन्न

२५ वे रौप्यमहोत्सवी कविसंमेलन दादरमध्ये; ८ मार्च रोजी साहित्यिक पर्वणी

२५ वे रौप्यमहोत्सवी कविसंमेलन दादरमध्ये; ८ मार्च रोजी साहित्यिक पर्वणी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेला उजाळा देणारे...
Read More
२५ वे रौप्यमहोत्सवी कविसंमेलन दादरमध्ये; ८ मार्च रोजी साहित्यिक पर्वणी

पाटपन्हाळे महाविद्यालयात संत गाडगे बाबा जयंती उत्साहात साजरी

पाटपन्हाळे महाविद्यालयात संत गाडगे बाबा जयंती उत्साहात साजरी नवीमुंबई (मंगेश जाधव) गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात संत गाडगे बाबा जयंती उत्साहात साजरी

दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ७६ धावांनी विजय

दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ७६ धावांनी विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील सुपर–८ गट १...
Read More
दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ७६ धावांनी विजय

गोवा विद्यापीठात २४ फेब्रुवारी रोजी “वर्ल्ड ओशियन सायन्स काँग्रेस २०२६” अंतर्गत राष्ट्रीय सागरी मच्छीमार संवाद

गोवा विद्यापीठात २४ फेब्रुवारी रोजी “वर्ल्ड ओशियन सायन्स काँग्रेस २०२६” अंतर्गत राष्ट्रीय सागरी मच्छीमार संवाद गोवा, २४ फेब्रुवारी २०२६: World...
Read More
गोवा विद्यापीठात २४ फेब्रुवारी रोजी “वर्ल्ड ओशियन सायन्स काँग्रेस २०२६” अंतर्गत राष्ट्रीय सागरी मच्छीमार संवाद

अर्थसंकल्पीय अधिवेशनात १५ विधेयके मांडली जाणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

अर्थसंकल्पीय अधिवेशनात १५ विधेयके मांडली जाणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत...
Read More
अर्थसंकल्पीय अधिवेशनात १५ विधेयके मांडली जाणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

रत्नागिरी जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

📰 रत्नागिरी जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग अध्यक्षपदासाठी अस्मिता केंद्रे तर उपाध्यक्षपदासाठी विलास चालके यांच्या नावांची जोरदार चर्चा   रत्नागिरी...
Read More
रत्नागिरी जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पा.शं.बापट कनिष्ठ महाविद्यालयात ‘शिवजयंती’ उत्साहात साजरी .

माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पा.शं.बापट कनिष्ठ महाविद्यालयात 'शिवजयंती' उत्साहात साजरी . रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे ...
Read More
माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पा.शं.बापट कनिष्ठ महाविद्यालयात ‘शिवजयंती’ उत्साहात साजरी .

ठाणे मराठा मंडळात शिवजयंती उत्सव दिमाखात साजरा

ठाणे मराठा मंडळात शिवजयंती उत्सव दिमाखात साजरा ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री...
Read More
ठाणे मराठा मंडळात शिवजयंती उत्सव दिमाखात साजरा

शंभू स्पोर्ट्स मनोर पालघर यांस कडून कुडली नं.03 शाळेला स्पोर्ट ड्रेसचे वितरण

शंभू स्पोर्ट्स मनोर पालघर यांस कडून कुडली नं.03 शाळेला स्पोर्ट ड्रेसचे वितरण आबलोली (संदेश कदम) जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श...
Read More
शंभू स्पोर्ट्स मनोर पालघर यांस कडून कुडली नं.03 शाळेला स्पोर्ट ड्रेसचे वितरण
Play sound