शाहिरी लोक कला मंच लवकरच मुंबईत नव्या ढंगात लोककला सादर करणार!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शाहिरी लोक कला मंच लवकरच मुंबईत नव्या ढंगात लोककला सादर करणार!

खडाळा (गुरुदत्त वाकदेकर) : शाहिरी लोक कला मंचचे समन्वयक ज्येष्ठ कथा लेखक आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे प्रसिद्धी प्रमुख काशिनाथ माटल यांनी कोरोना काळात, निरपेक्षपणे काम करणाऱ्या कोविड योद्धांच्या समर्पित जीवनावर साकारलेल्या नऊ उत्कंठावर्धक कथांचा समावेश असलेल्या “सावट” कथासंग्रहाचे येत्या दि.२१ ते २३ फेब्रुवारी या काळात दिल्लीत पार पडणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन होणार आहे, त्यानिमित्ताने खंडाळा येथे पार पडलेल्या मंचच्या कलाकारांच्या सर्वसाधारण सभेत काशिनाथ माटल यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. मंचचे अध्यक्ष शाहीर शांताराम चव्हाण, सरचिटणीस शाहीर मधु खामकर यांच्या हस्ते काशिनाथ माटल यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करण्यात आला. मंचचे अंतर्गत हिशोब तपासणीस रवींद्र पारकर यांनी‌‌ ‘”स्वतःलाच रचित गेलो” हे उत्कृष्ट पुस्तक लिहिल्याबद्दल त्यांचाही शाल-श्रीफळाने यथोचित सन्मान करण्यात आला. संस्थेचे समन्वयक आणि लेखक काशिनाथ माटल यांच्या “सावट” या पुस्तकाच्या दिल्ली मराठी साहित्य संमेलनातील प्रकाशनाने आमचा स्वाभिमान द्विगुणित झाला, अशा भावना अनेक कलाकारांनी आपल्या भाषणात व्यक्त केल्या. 

खंडाळा येथील रा. मि. म. संघाच्या गं. द. आंबेकर स्मृती श्रम साफल्य प्रशिक्षणालयात शुक्रवार आणि शनिवार असे दोन‌ दिवसाचे‌ शिबिर पार पडले. त्यावेळी गौरव समारंभाबरोबरच शिबीरात आजचे आघाडीचे ज्येष्ठ संगीतकार मनोहर गोलांबरे यांच्या नियोजनाखाली सर्वश्री अध्यक्ष शाहीर शांताराम चव्हाण, ज्येष्ठ संगीतकार खजिनदार महादेव खैरमोडे, सरचिटणीस शाहीर मधू खामकर, शाहीर आनंद सावंत, ज्येष्ठ नृत्यांगना सुरेखा काटकर, पत्रकार काशिनाथ माटल आणि नृत्यविशारद गणेश कारंडे यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. समितीच्या नियोजनातून जून्या-नव्या कलेचा मेळ घालून लवकरच रसिकांना आवडेल अशी नव्या रूपात पारंपरिक शाहिरी लोककला मुंबईत सादर करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला गाढवाचे लग्न फेम शाहीर कमलाकर पाटील, ज्येष्ठ नृत्यांगना सुरेखा काटकर, जुन्या काळातील लोक कलेमधील नृत्यांगना मानिक मयेकर आदी‌‌ कलाकार त्यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी स्वरीता पाटकर, तेजस्वीनी वाडेकर, शर्वरी पवार, गीता गोलांबरे, अरूण थोरात, सुदाम हुलावळे आदी कलाकारांनी चर्चेत भाग घेतला. नव्या ढंगाचा कार्यक्रम मुंबईत मंचच्या वर्धापन दिनाच्या औचित्याने सादर करण्यात येणार आहे.

मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला, ही गोष्ट लक्षात घेऊन दिल्लीत तालकटोरा येथे मराठी साहित्य संमेलन ‘न भूतो न भविष्यति’ ठरावे, असा प्रयत्न संमेलनाचे निमंत्रक संस्था सरहद्दचे प्रमुख संजय नाहर आणि अन्य सहकारी करत आहेत. दिल्ली ग्रंथ प्रकाशन समितीचे अध्यक्ष, साहित्यिक, प्रकाशक घनश्याम पाटील यांच्या चपराक प्रकाशनच्या विद्यमाने वैविध्यपूर्ण विषयांवर सर्वाधिक २५ पुस्तके प्रकाशित होत आहेत. त्यात कोविड काळावर आधारीत पहिलेच ‘सावट” हे पुस्तक प्रकाशित होत आहे, ही गोष्ट निश्चितच स्वागतार्ह आहे, अशी माहिती संस्थेचे समन्वयक लेखक काशिनाथ माटल यांनी या प्रसंगी दिली. शिबिरात मंचच्या पुढील वाटचालीवर सांगोपांग चर्चा झाली.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह; विद्यार्थिनींना करिअरच्या नव्या संधी

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह; विद्यार्थिनींना करिअरच्या नव्या संधी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): सेवा मंडळ एज्युकेशन...
Read More
श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह; विद्यार्थिनींना करिअरच्या नव्या संधी

भोपरमध्ये पाणीटंचाई कायम; अपुरा पुरवठा तरीही पूर्ण वर्षाची बिल – अधिकाऱ्यांची बेफिकीरी उघड

भोपरमध्ये पाणीटंचाई कायम; अपुरा पुरवठा तरीही पूर्ण वर्षाची बिल – अधिकाऱ्यांची बेफिकीरी उघड प्रतिनिधी :- निलेश रहाटे    कल्याण डोंबिवली...
Read More
भोपरमध्ये पाणीटंचाई कायम; अपुरा पुरवठा तरीही पूर्ण वर्षाची बिल – अधिकाऱ्यांची बेफिकीरी उघड

नाट्य कलावंत व भजनी कलावंत श्री मारुती रोहीलकर यांचा वेलदुर नवानगर शाळेमध्ये सत्कार संपन्न

नाट्य कलावंत व भजनी कलावंत श्री मारुती रोहीलकर यांचा वेलदुर नवानगर शाळेमध्ये सत्कार संपन्न गुहागर ~श्रीराम नाट्य मंडळाचे दिग्गज कलावंत...
Read More
नाट्य कलावंत व भजनी कलावंत श्री मारुती रोहीलकर यांचा वेलदुर नवानगर शाळेमध्ये सत्कार संपन्न

मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ’ व्यवसायातून कोकणातील महिलांचा शाश्वत विकास शक्य- डॉ. केतन चौधरी

मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ’ व्यवसायातून कोकणातील महिलांचा शाश्वत विकास शक्य- डॉ. केतन चौधरी रत्नागिरी - दिनांक १७ मार्च २०२६ रोजी डॉ. बाळासाहेब...
Read More
मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ’ व्यवसायातून कोकणातील महिलांचा शाश्वत विकास शक्य- डॉ. केतन चौधरी

गिलचा झंझावात, गुजरातची कोलकातावर ५ गडी राखून मात

गिलचा झंझावात, गुजरातची कोलकातावर ५ गडी राखून मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील २५व्या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता...
Read More
गिलचा झंझावात, गुजरातची कोलकातावर ५ गडी राखून मात

कोकणातील शेतकऱ्याला भरघोस मदत द्यावी; रामदासभाई कदम यांची सरकारकडे आग्रही मागणी

कोकणातील शेतकऱ्याला भरघोस मदत द्यावी; रामदासभाई कदम यांची सरकारकडे आग्रही मागणी अवकाळी पाऊस आणि उष्णतेमुळे ९० टक्के हापूस आंबा बागांचे...
Read More
कोकणातील शेतकऱ्याला भरघोस मदत द्यावी; रामदासभाई कदम यांची सरकारकडे आग्रही मागणी

गुहागर: जलजीवन मिशनची ३० टक्के शिल्लक कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करा; सभापती प्रणव पोळेकर यांचे निर्देश

गुहागर: जलजीवन मिशनची ३० टक्के शिल्लक कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करा; सभापती प्रणव पोळेकर यांचे निर्देश वेळणेश्वर: गुहागर तालुक्यातील जलजीवन...
Read More
गुहागर: जलजीवन मिशनची ३० टक्के शिल्लक कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करा; सभापती प्रणव पोळेकर यांचे निर्देश

दक्षिण मुंबईतील वरळी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

दक्षिण मुंबईतील वरळी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी नवीमुंबई (मंगेश जाधव ) महामानव भारतरत्न...
Read More
दक्षिण मुंबईतील वरळी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

पीएचसीमधून खासगी रुग्णालयांकडे डिलिव्हरीसाठी पाठवणाऱ्यांवर कारवाई; 14 रुग्णवाहिकांचा प्रस्ताव द्या – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

पीएचसीमधून खासगी रुग्णालयांकडे डिलिव्हरीसाठी पाठवणाऱ्यांवर कारवाई; 14 रुग्णवाहिकांचा प्रस्ताव द्या – पालकमंत्री डॉ. उदय सामंत जिल्हा शासकीय रुग्णालयाची कामगिरी उंचावली;...
Read More
पीएचसीमधून खासगी रुग्णालयांकडे डिलिव्हरीसाठी पाठवणाऱ्यांवर कारवाई; 14 रुग्णवाहिकांचा प्रस्ताव द्या – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

देव भक्तांच्या भेटीला येतोय! तवसाळमध्ये श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी उत्सव सोहळा उत्साहात सुरू 

देव भक्तांच्या भेटीला येतोय! तवसाळमध्ये श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी उत्सव सोहळा उत्साहात सुरू  अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घरोघरी होणार देवीचे...
Read More
देव भक्तांच्या भेटीला येतोय! तवसाळमध्ये श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी उत्सव सोहळा उत्साहात सुरू