पनवेल – पनवेलमधील कर्नाळा किल्ल्यावर झालेल्या या धक्कादायक घटनेत ५० पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला झाला. या हल्ल्यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले. हे सर्व पर्यटक ट्रेकिंगसाठी किल्ल्यावर आले होते, आणि किल्ल्यावर गोंधळ झाल्याने मधमाशांचा झुंड भडकला. जखमी पर्यटकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
पनवेलमधील कर्नाळा किल्ल्यावर झालेल्या या धक्कादायक घटनेत ५० पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला झाला. या हल्ल्यात एका पर्यटकाचा मृत्यू
या घटनेनंतर ट्रेकिंग करताना काही महत्वाच्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. ट्रेकिंगला जाताना अत्तर, डिओ, किंवा फर्फ्युम न लावणे आवश्यक आहे, कारण सुगंधामुळे मधमाशा अधिक आक्रमक होऊ शकतात. तसेच, जंगलातील प्राणी, पक्षी इत्यादींना त्रास देणे टाळावे आणि शक्यतो शांततेने हल्ल्यापासून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा, असे ट्रेकिंग ग्रुप्स मार्गदर्शन देतात
.