राज्यात दरवर्षी महसूल क्रीडा स्पर्धांचे आयोजन – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात दरवर्षी महसूल क्रीडा स्पर्धांचे आयोजन – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

कोकण विभागाला सर्वसाधारण विजेतेपद, छत्रपती संभाजीनगर दुसऱ्या तर पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर

नांदेड, ता. २५: राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धांमध्ये कोकण विभागाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले असून, यजमान छत्रपती संभाजीनगरने द्वितीय आणि पुणे विभागाने तृतीय क्रमांक मिळवला. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धांचा समारोप रविवारी (ता. २५) मोठ्या उत्साहात पार पडला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.

महसूलमंत्री बावनकुळे यांनी यापुढे ही क्रीडा स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाणार असून, त्यासाठी राज्य शासन एक कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याची घोषणा केली. तसेच, महसूल विभागातील क्रीडापटूंना नियुक्ती व पदोन्नतीमध्ये प्राधान्य देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

तीन दिवसांचा क्रीडा महोत्सव
या स्पर्धेत नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, कोकण तसेच नोंदणी मुद्रांक व भूमि अभिलेख या सात विभागांतील २,००० हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. क्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल, जलतरण, बुद्धिबळ, टेबल टेनिस, बॅडमिंटन यांसह ८३ प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या.

सांस्कृतिक स्पर्धांमध्ये नाशिक विभागाने प्रथम क्रमांक पटकावला, तर कोकण विभाग दुसऱ्या आणि नागपूर विभाग तिसऱ्या स्थानावर राहिला. तसेच, संचलन स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर विभागाने बाजी मारली.

नागरिकांसाठी WhatsApp Grievance App लोकार्पण
महसूलमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या WhatsApp Grievance App चे लोकार्पण करण्यात आले. या सुविधेमार्फत नागरिक ९२७०१०१९४७ या क्रमांकावर आपल्या तक्रारी व मागण्या पाठवू शकतात.

समारोप सोहळ्यास खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, आ. तुषार राठोड, आ. राजेश पवार, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, विशेष पोलीस महानिरीक्षक शाहाजी उमाप, तसेच जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी आणि महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसाठी या क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहवर्धक ठरल्या असून, पुढील वर्षीच्या आयोजनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

रत्नागिरीत भव्य 'पत्रकार भवन' साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - उदय सामंत...
Read More
रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर मुंबई: गॅस सिलिंडरचे वाढते दर...
Read More
LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन;...
Read More
चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...