शिक्षणसेवकांच्या व्यथा राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अन्यायकारक असलेले शिक्षणसेवक हे पद रद्द करावे या मागणीसाठी शिक्षणसेवकांची राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेणार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिक्षणसेवकांच्या व्यथा राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अन्यायकारक असलेले शिक्षणसेवक हे पद रद्द करावे या मागणीसाठी शिक्षणसेवकांची राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेणार

रत्नागिरी : राज्यातील हजारो शिक्षणसेवकांच्या व्यथा राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अन्यायकारक असलेले शिक्षणसेवक हे पद रद्द करावे या मागणीसाठी शिक्षणसेवकांची राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेणार असून या परिषदेला महारष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे, शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर , विविध शिक्षणतज आणि लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करणार असल्याची माहिती शिक्षण सेवक कृती समितीचे जावेद तांबोळी यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात शिक्षण सेवक कृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समितीचे पदाधिकारी विजय पाटील, वसंत कदम, विवेक किल्लेदार, शिवाजी गाढवे उपस्थित होते.

अधिक माहिती देताना श्री. तांबोळी म्हणाले, “राज्यसरकारने सर्वात मोठी शिक्षकभरती करून सुमारे २१ हजार पेक्षा जास्त शिक्षकांची पदे भरून शाळेला आणि विद्यार्थ्यांना शिक्षक दिले आहेत. गेली अनेक वर्ष नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अभियोग्यता धारकांना नोकरी मिळाल्याचा आनंद आहे मात्र त्याचसोबत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यचा प्रश्न देखील आहे याचे कारण म्हणजे शिक्षणसेवकांना अगदी तुटपुंजा मानधनावर काम करावे लागत आहे.”

“तीन वर्ष इतका मोठा काळ असलेले शिक्षनसेवक रद्द करावे या मागणीने आता राज्यभर जोर धरलाय. डी एड, बी एड, TET. (शिक्षक पात्रता परीक्षा) CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) आणि TAIT (शिक्षक अभियोग्यता व बु‌द्धिमापन चाचणी) या सर्व परीक्षा उतीर्ण होऊन, स्वताची गुणवत्ता सिद्ध करूनही पुन्हा तीन वर्ष प्रोबेशन कालावधी लावणे आणि तोही तीन वर्ष हे पुरागामी प्रगत राज्याला अशोभनीय आहे,” असे त्यांनी सांगितले.

“राज्यात २००० साली शिक्षणसेवक हे पद सुरू करण्यात आले. त्यावेळच्या राज्याच्या परिस्थितीनुसार हे पद सुरू केले होते; मात्र राज्याची परिस्थिती बदललेली असून, आपले राज्य प्रगत आहे. इतर कोणत्याही राज्यात (महाराष्ट्र, गुजरात वगळता) शिक्षणसेवक हे पद नाही. राज्यात अनेक वर्षानंतर मोठी शिक्षक भरती केली आहे; मात्र काही शिक्षणसेवकांना इतर जिल्ह्यात जाऊन अल्पशा मानधनावर काम करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य प्रगत विकसित आणि पुरोगामी राज्य आहे. इतर अप्रगत राज्यात शिक्षणसेवक पद्धत अस्तित्वात नाही. मात्र राज्यात शिक्षणसेवक असणे हे महाराष्ट्राला भूषणाव नाही. सन २०१९ आणि २०२४ मध्ये झालेल्या शिक्षकभरतीत शिक्षकांचे वय सरासरी ३५ वर्ष आहे. त्यामुळे त्यांना कमाल २३ वर्ष अल्पसेवा काळ मिळतो. त्यातही पुन्हा ३ वर्ष शिक्षणसेवक म्हणून काम करणे हे अन्यायकारक आहे,” असे मत विवेक किल्लेदार आणि मनोहर इनामे यांनी व्यक्त केले.

शिक्षणसेवक कालावधीत शिक्षकांचे ३ वेतनवाढीचे नुकसान होते. त्याचा नकारात्मक परिणाम शिक्षकांच्या संपूर्ण सेवा कालावधीवर होतो. महाराष्ट्रापेक्षा लहान दिल्लीसारख्या राज्यात अकुशल मजुरांना किमान १८ हजार प्रतिमहा वेतनाची हमी आहे. महारष्ट्रात मात्र कुशल डीएड, बीएड, TET, CTET आणि TAIT आदी परीक्षेद्‌वारे अभियोग्यता सिध्द केलेल्या शिक्षकांना अल्प मानधनावर काम करावे लागत आहे, ही गोष्ट अन्यायकारक आहे. राज्यस्थान उच्च न्यायालय जोधपूर, रीट याचिका क्रमांक १४६५/२०२० यामध्ये प्रोबेशन कालावधीत पूर्ण पगार द्यावा, असे म्हटले आहे.

शिक्षक आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांनी नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात शिक्षणसेवक हे पद रद्द का व्हावे याब‌द्दल लक्षवेधी मांडली. इतर राज्यात शिक्षकांना थेट नियुक्त्या दिल्या जातात केवळ महाराष्ट्र आणि गुजरात या दोनच राज्यात शिक्षणसेवक कालावधी आहे.

यावेळी “राज्यातील शिक्षणसेवक हा अन्यायकारक कालावधी रद्द करावा”, “जर कालावधी रद्द करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यास विलंब होत असल्यास याचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास समिती गठीत करावी” आणि “समितीचा अहवाल येईपर्यंत शिक्षणसेवकांचे मानधन वाढवून किमान कालावधी कमी करावा” या मागण्यांसाठी शिक्षणसेवकांनी दोन कृती कार्यक्रम हाती घेतले असून यामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्हावार पत्रकार परिषद घेऊन शिक्षणसेवकांच्या व्यथा मांडणे, त्यानंतर राज्यस्तरिय शिक्षणसेकांची शिक्षण परिषद आयोजित करून या परिषदेला शिक्षणमंत्री दादाजी भुसे, शिक्षणराज्य मंत्री प्रशांत भोयर आणि लोकप्रतिनिधीना निमंत्रित करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला!

गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला! बुकिंग होऊनही सिलिंडर मिळेना, पण 'ओटीपी' आला! ५२ सिलिंडरचा परस्पर काळाबाजार होत असल्याचा ग्राहकांचा...
Read More
गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला!

गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची ‘नवोदय’साठी निवड

:गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची 'नवोदय'साठी निवड ग्रामीण भागातून यशाची उंच भरारी; ९३.७५% गुण मिळवून पटकावला...
Read More
गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची ‘नवोदय’साठी निवड

जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त

*जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त* राजापूर दि.२३ (प्रशांत पवार ) राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे...
Read More
जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त

सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात ‘महा’संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार?

सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात 'महा'संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार? सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली! भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी संघर्षाने राजकीय...
Read More
सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात ‘महा’संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार?

रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

रत्नागिरीत भव्य 'पत्रकार भवन' साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - उदय सामंत...
Read More
रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर मुंबई: गॅस सिलिंडरचे वाढते दर...
Read More
LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन;...
Read More
चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...