तळवली ज्युनियर काॅलेजमध्ये ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ श्री.ज्ञानेश्वर झगडे यांच्या कविता वाचनाने उत्साहात साजरा..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तळवली ज्युनियर काॅलेजमध्ये ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ श्री.ज्ञानेश्वर झगडे यांच्या कविता वाचनाने उत्साहात साजरा…

तळवली (मंगेश जाधव)

पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता.गुहागर जि. रत्नागिरी या प्रशालेत दि. 27 फेब्रुवारी 2025 रोजी ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ श्री. ज्ञानेश्वर झगडे यांच्या कविता वाचनाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

गुहागर येथील जेष्ठ कवी श्री. ज्ञानेश्वर झगडे यांनी आपल्या स्वरचित कविता वाचून,गाऊन दाखवले. त्या कवितेत उपस्थित विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले.त्यांच्या कविता मनाला भिडणा-या,विचारमग्न व्हायला लावणा-या तसेच आत्मचिंतन करायला लावणा-या होत्या. त्यामध्ये आम्ही कोकणचे राजं, छप्पर सोन्याचं, माय बाप, स्वच्छता गीत या सारख्या एका पेक्षा एक कविता ऐकून विद्यार्थिही भारावून गेले होते.उस्फूर्तपणे टाळ्या वाजवून दादही देत होते. त्याबद्दल कवी ज्ञानेश्वर झगडे यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री. बी.ए.थरकार सर यांच्या ‘नवी पहाट’ या कविता संग्रहातील निवडक कवितांचे वाचन केले. कविता वाचन केलेल्या विद्यार्थिनींमध्ये कु.शर्वरी महेश शितप,कु.रिया रामचंद्र आंबेकर,कु.श्रावणी सोनू कळंबाटे,कु.दीक्षा धनेश दुर्गवले यांनी सहभाग घेतला. या कविता ऐकून उपस्थित विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते.

मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मराठी विषयाच्या प्रा.सौ.जड्याळ मॅडम यांनी मराठी साहित्यावर आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते. ‘मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त’ आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांपैकी प्रथम क्रमांक- कु.मनस्वी रवींद्र जोगळे, द्वितीय क्र.कु.आकांक्षा दिलीप भुवड, तृतीय क्र- कु.अनिश अंकुश जोगळे तर कु.शिवानी कैलास गुरव,कु.दीक्षा दिनेश पड्याळ,कु.रसिका प्रकाश डाकवे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावली. या स्पर्धेत सुयश प्राप्त विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्राॅफी व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे, सामान्यज्ञान वाढविणे व स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण करणे हा हेतू होता. या स्पर्धेत इयत्ता अकरावीचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना मराठी विषयाच्या प्रा.सौ. जड्याळ मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. सौ.जड्याळ मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रस्ताविक केले.जेष्ठ कवी ज्ञानेश्वर झगडे यांना प्राचार्य श्री.एम.ए.थरकार सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विषयाच्या प्रा.जड्याळ मॅडम यांनी केले. तर प्रा. सौ.आयरे मॅडम यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

तळवली ज्युनियर काॅलेजमध्ये ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ श्री.ज्ञानेश्वर झगडे यांच्या कविता वाचनाने उत्साहात साजरा

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन